दिपक गायकवाडसर
संपादक निर्भिड आवाज न्युज
भारत हा विविधतेने नटलेला आहे, पण तो आतून किती फुटलेला आहे याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे हा कायदा होय. हा कायदा महाराष्ट्र राज्यात ३० जूलै २०२६ पासून लागू झाला. याच्या नावावरून हा महाराष्ट्रीयन माणसाला धर्मस्वातंत्र्य दिल्याचा भास प्रथमदर्शनी होतो. आणि यामुळे माणूस फसतो. पण या कायद्याने भारतीय नागरिकाच्याच संविधानिक स्वातंत्र्य मुल्यांची व धार्मिक स्वातंत्र्याचीच गळचेपी केली आहे. तसेच भारतीय माणसाचे संपूर्ण जीवीतस्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे. तसेच हा कायदा प्रत्येक माणसाला धार्मिक गुलामीच्या बंधनात अडकवून ठेवण्यास भाग पाडतो. हा कायदा लागू करण्याचे कारण म्हणजे भारताचे हि़दूस्थान करण्यासाठी संविधानिक धर्मनिरपेक्षतेची ठरलेली सर्वात मोठी अडचण हि होय. कारण भारतात धर्मनिरपेक्षता हि काय संविधाना नतंर जन्माला आली असे नाही, तर ती संविधानाने अधोरेखित केली व ती संविधानाचे मूल्य ठरली. पण संविधानाच्या जन्मा अगोदर भारतात धर्मांतरे झालीच नाहित का? जर झाली नसतील तर मुस्लिम, ख्रिस्ती या परदेशीय धर्मांची लोकसंख्या भारतात कशी काय वाढली? या प्रश्नांचा आपण प्रथम बारकाईने विचार केला पाहिजे. म्हणजेच भारतात संविधानाच्या जन्मा अगोदर राजरोस व दिवसा ढवळ्या धर्मांतरे हि होतच होती. यामुळेच तर भारतात बौद्ध धर्म, जैनधर्म, शीखधर्म, लिंगायत धर्म यांचा उदय झाला. तसेच भारतात ज्यांना हिंदूधर्म सोडून नवीन धर्म स्थापने आवघड होते त्यांनी फक्त आपली चूल हिंदू धर्मापासून वेगळी करून पंथ व संप्रदायांची निर्मिती केली. दत्तपंथ, शिवपंथ, नाथ पंथ व वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय जन्मास आले. एवढेच नाहीतर आजही स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाचा शिवधर्म, आदिवासींचा ‘आदिवासी धर्म ‘ यांची स्थापना झालीच ना? मग हे द्योतक हिंदू धर्माच्या एकतेचे आहे की फूटीरतेचे आहे हा खरा प्रश्न उपस्थित होतो. कारण हिंदूधर्म जर इतका मानवतावादी व सहिष्णूतावादी होता तर त्याचे एवढी छकले व तुकडे का झाली? का डॉ. बाबासाहेब आंबेडकरां सारख्या महामानवाला बौद्ध धर्मात धर्मांतर करावे लागले? ते तर सर्वात मोठे देशभक्त व संविधान निर्माते होते. तरी त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात हा धर्मांतराचा निर्णय सरतेशेवटी का घ्यावा लागला? तसेच या महाराष्ट्रातील मराठा व आदिवासी समाजाला आपापल्या नविन धर्मांची स्थापना का करावी लागली व तीही हजारो पिढ्या हिंदूधर्मात राहूनच का करावी लागली? याला जबाबदार कोण? या सर्वच धार्मिक घडामोडींचा विचार केला तर याला सर्वस्वी जबाबदार फक्त हिंदू धर्माचे पुरोहितपण स्विकारलेले व स्वतःला स्वतःच उच्च वर्णिय व वर्णश्रेष्ठ ठरवून घेतलेल्या ब्राह्मण वर्गाची आहे. खरे तर या ब्राह्मण वर्गाला वर्णश्रेष्ठत्वाचा उच्चतेचा दर्जा हा कोणी दिला? या निर्णयाला मूळभारतीय तिन्ही वर्णाची सम्मती व होकार होता का? हा प्रश्न आज हिंदू धर्मातील इतर वर्णीय का विचारत नाहीत? ते त्यांचा अधिकार का बजावत नाहीत? किंवा आजपर्यंत का बजावला नाही? हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. तसा विचार केला तर या भारतीय भूमीत सर्वात पहिल धर्मांतर हे हिंदूचेंच झाले व ते परकीय वंशाचे व परकीय वैदिक धर्माचे असणाऱ्या आर्यवैदिक ब्राम्हणांनीच केले. कारण आर्य वैदिक ब्राह्मण खैबरखिंडी मार्फत भारतात येण्या अगोदर मूळभारतीयांना कोणताच धर्म व पंथ नव्हता. तर होती ती मानवतावादी व सहिष्णूतावादी ‘ सिंधू संस्कृती ‘ होती. त्यांनाच या परकीय परधर्मी वैदिक आर्य ब्राम्हणांनी त्यांच्या वेदिक धर्मात धर्मांतर करून घेतले. नतंर बुद्धकाळात या वैदिक नर्माचे रूपांतर ‘ बौद्ध सनातन ‘ धर्मात केले. यानंतर मुस्लिम राजवटीत याच बौद्ध सनातन धर्माला हिंदूधर्म हे नवीन नाव दिले व स्वातंत्र्यानंतर याच हिंदूधर्माला हिंदूत्वाचा मुलामा चढवून आपले परकीयपण झाकण्यासाठी मुस्लिम,ख्रिस्तींना देशद्रोहाच्या पिंजऱ्यात उभे करून, देशाच्या बंधूत्वाला व मानवी अखंडतेला शह देवून देशद्रोहाची सीमा गाठली. आणि आज धर्मसुरक्षा कायदा आणून हिंदू धर्मातल्याच हिंदू धर्मियांना इतर धर्मात जाण्यावर बंधणे लादण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
विशेष म्हणजे हा कायदा आणण्याची व तोही अगदी गुप्तपणे मागच्यादाराने आणण्याची गरज नेमकी या सरकारला का पडली? धर्मांतर करतानी नव्वद दिवस आगोदर अर्ज करून परवानगी घेण्याची तरतूद यात का करावी लागली? तसेच परवानगी न घेता धर्मांतर केल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरवून त्याला सातवर्षाची कैद का ठेवावीसी वाटली? इतके असे मूळभारतीय जनतेकडून काय चूकले? या सर्वच प्रश्नाचे उत्तर तपासून बघितले तर असे दिसते की, धर्मांतर करणा-याची संख्या व सर्वात जास्त ओघ हा हिंदू धर्मातून दूस-या धर्मात हिंदूचाच आहे. प्रत्येक दिवसातून एकतरी धर्मांतर हे या देशात फक्त हिंदूचेेच होते. हिंदू धर्मियच सर्वात जास्त इतर धर्मात धर्मांतर करताना दिसतात व ते बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम या धर्मात जातात. यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या घटत आहे ती फक्त हिंदूधर्माचीच घटते आहे. मग प्रश्न हा निर्माण होतो की, धर्मांतराचे खरे ग्रहण कोणत्या धर्माला लागलेले आहे? मग हिंदू धर्मालाच जर धर्मांतराचे ग्रहण लागलेले आहे,तर मग भारताचे हि़दूस्थान कोणाच्या जीवावर करायचे हा सर्वात मोठा प्रश्न या परकीय परधर्मी ब्राम्हणवाद्यांना व त्यांची मातृसंघटना असणाऱ्या आरएसएस या संघटनेला पडला असावा. तसेच भारताचे नामकरण हि़दूस्थान व भारतातच हिंदू अल्पसंख्याक ठरत असतील किंवा त्यांचीच लोकसंख्या कमी झाली तर, एवढे करूनही भारताची राजकीय सुत्रे इतर जास्त लोकसंख्या असणाऱ्या धर्मियांच्या हातात जातील. मग भारताला धर्माच्या नावावर ब्राम्हणी गुलाम बनवायचे तर कोणाला बनवायचे हा सर्वात मोठा प्रश्न तयार होतो. खरे तर या परकीय ब्राम्हणी वर्गाने पहिल्यापासूनच बंधूभावाचे, सहिष्णूततेचे व मानवतेचे धोरण स्विकारून अंतकरणात मूळभारतीयां विषयी राष्ट्रप्रेमाचे, देशभक्तीचे व परिवर्तनाचे धोरण ठेवले असते तर, आज भारत हा जातीजातीत व धर्माधर्मात फुटलाच नसता. एवढेच नाहीतर भारत जो बुद्ध काळात ‘ जंबुद्वीप ‘ म्हणून जगात प्रसिद्ध होता, त्याचे अफगाणिस्तान, तिबेट, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान व भारत असे देशी तुकडे झालेच नसते. तसेच हिंदू महार, हिंदू मराठा व हिंदू आदिवासी यांनी धर्मांतर केलेही नसते व नवीन धर्मही स्थापले नसते. पण पहिल्यापासून मूळभारतीयांवर आपले परकीय ब्राम्हणी राज्य कसे स्थपता येईल व धार्मिकतेच्या व अंधश्रद्धेच्या नावार त्यांचे सर्वच बाबतीत शोषण कसे करता येईल, हे अमानुष धोरण ठेवल्याने, या अखंडतेचा संपूर्ण खेळखंडोबा झालेला आहे व याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त या देशातला ब्राम्हणी वर्गच जबाबदार आहे. उलट मूळभारतीयांनी आपल्या ब्राम्हण जमातीला आपले म्हणून परकीय असतानाही स्विकारले होते ना, मग त्यांच्यात जातीयद्वेष पेरून त्यांना एकमेकां पासून विभक्त करायची व ठेवायची गरजच नव्हती. बरे काळानुसार काही चूका झाल्या असतील तर त्या बदलत्या काळप्रवाहानुसार बदलायला पाहिजे होत्या. परिवर्तनाचा मार्ग अवलंबवयाला पाहिजे होता. पण तो न स्विकारता भारतीय स्वातंत्र्यदिनाला शोकदिन म्हणून त्याची अवहेलना करणे, प्रजासत्ताक दिनाल काळादिन म्हणून त्याची टिंगल टवाळी करणे, भारतीय संविधाना विरोधात मनूस्मृतीचा उदोउदो करणे व भारतीय लोकसंसदेपेक्षा धर्मसंसद महान व मोठी आहे असे म्हणणे, हे काही देशक्तीचे व देशोद्धाराचे लक्षण नव्हते व मार्गही नव्हते. तरीपण आपण तसे हिंदूत्वाच्या जोरावर केले व अवलंबले गेले सुद्धा. यामुळे आता आपले हे हिंदूत्वाचे व देशशोषणाचे भांडवल मूळभारतीय जनतेच्या लक्षात आलेले आहे. तेंव्हा आज आपण आपल्या फायद्यासाठी व मूळभारतीयांचे हिंदूत्वाच्या नावाखाली शोषण करून आपली राजकीय पोतडी भरण्यासाठी जरी हा धर्मसुरक्षा कायदा आणला आसला तरी, तो भारतीय जनता स्विकारतील किंवा भारतीय तरूण वर्ग त्याला मंजूरी देतील या गुलामी भावनेत कोणी राहू नये. कु-हाडीचा दांडा गोतास काळ हे वाक्या आजच्या राजकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे. कारण वेळ आल्यावर परत याची कोणी आठवण करून देणार नाही.




