श्री क्षेत्र अक्कलकोटचे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान
जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि. १७ सप्टेंबर २०२६ सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान करत लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या वतीने संपादक गणेश जाधव यांना ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. श्री क्षेत्र अक्कलकोट येथे आयोजित या शानदार सोहळ्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.लायन्स क्लब अक्कलकोटच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे,समाजप्रबोधन करणे आणि सकारात्मक बातम्यांद्वारे समाजविकासात हातभार लावणे या कार्याची दखल घेत संपादक गणेश जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त चंद्रकांत कापसे,लायन्स क्लब अक्कलकोटचे पदाधिकारी, सदस्य आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल संपादक गणेश जाधव यांच्यावर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




