पुस येथे 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा – पंचरंगी ध्वजारोहण, खीर दान व बौद्ध वंदनेने वातावरण धम्ममय
अंबाजोगाई प्रतिनिधी
महेंद्र गोदाम
अंबाजोगाई : दि. २१ ऑक्टोबर २०२६ (पुस) समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश देणारा 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून सामाजिक क्रांती घडवली होती. त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले आणि धम्म परंपरेनुसार खीर दान वाटप करण्यात आले.
परिसरात निळे झेंडे आणि जय भीमच्या घोषणांनी वातावरण धम्ममय झाले होते.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर उपस्थित होते –
माजी सरपंच वसंतराव देशमुख, रकमाजी सावंत. पंचायत समिती सदस्य अंबाजोगाई ,सिद्धार्थ सावंत, कर्णमूर्ती साळवे, विशाल साळवे, सतीश साळवे, शुभम साळवे, सुरज सावंत, सुधीर सावंत, वैभव सावंत, अमर साळवे, बुद्धिवंत सावंत, सुरेश साळवे, आदर्श वाघमारे, मयूर सावंत, दयानंद साळवे विष्णु सावंत, निशांत गायकवाड, सागर सावंत व सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष – रिपब्लिकन बहुजन सेना, बीड यांनी केले होते.
कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.







