रामकिसन अवधूत
जालना प्रतिनिधी
जालना : दि. २८ ऑक्टोबर २०२६ अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल 12 एकर उभे ऊस पीक विद्युत वाहिनीच्या स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. या आगीत शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ दखल घेऊन मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.या बाबत अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग झाले. त्यामुळे शेतात अचानक आग लागली आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.या आगीत खालील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे -1. सुभाष बापूराव पावसे – गट नं. 1182. रामराव बापूराव पावसे – गट नं. 1173. विजय रामराव पावसे – गट नं. 1144. राजेंद्र रामराव पावसे – गट नं. 114, 1155. मंडाबाई श्यामराव पावसे – गट नं. 1166. अप्पासाहेब श्यामराव पावसे – गट नं. 113, 115 (सर्व रा. पावसे पांगरी, ता. अंबड, जि. जालना)सदर आगीमुळे अंदाजे 12 एकर ऊस पीक, ठिबक सिंचन संच, पाईप व इतर शेती साहित्य पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली असून, महावितरण व महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.दुष्काळात आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या घटनेमुळे मोठा फटका बसला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
- अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल 12 एकर उभे ऊस पीक विद्युत वाहिनीच्या स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. या आगीत शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ दखल घेऊन मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.
या बाबत अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग झाले. त्यामुळे शेतात अचानक आग लागली आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.
या आगीत खालील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे –
- सुभाष बापूराव पावसे – गट नं. 118
- रामराव बापूराव पावसे – गट नं. 117
- विजय रामराव पावसे – गट नं. 114
- राजेंद्र रामराव पावसे – गट नं. 114, 115
- मंडाबाई श्यामराव पावसे – गट नं. 116
- अप्पासाहेब श्यामराव पावसे – गट नं. 113, 115 (सर्व रा. पावसे पांगरी, ता. अंबड, जि. जालना)
सदर आगीमुळे अंदाजे 12 एकर ऊस पीक, ठिबक सिंचन संच, पाईप व इतर शेती साहित्य पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली असून, महावितरण व महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.
दुष्काळात आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या घटनेमुळे मोठा फटका बसला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.







