दिपक गायकवाड
संपादक निर्भिड आवाज न्यूज
दि.२५ ऑक्टोबर २०२६ धर्म हि माणसाच्या जीवनातील खाजगी बाब आहे. कोणी कोणता धर्म स्विकारावा व कोणत्या धर्माचे अनुकरण करून अनुयायी व्हावे हा जसा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तसाच त्याने कोणत्या धर्माचा प्रचार प्रसार करावा हाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण संपूर्ण जगात धर्माची चिकित्सा करून धर्म स्विकारणारे फार थोडे असतात. तसेच धर्म न मानणारेही तितक्याच संख्येने कमी असतात. म्हणून ते धर्माचे घटक नसतात असे मूळीच म्हणता येत नसते. उलट ते विशिष्ट एकाच कोणत्या धर्माच्या तत्त्वज्ञानाने पागल झालेले नसतात तर, ते धर्म नावाच्या संकल्पनेच्या उच्चकोटीतल्या तत्त्वांचे अनुयायी किंवा मोठे अभ्यासक असतात. त्यांनी जगातल्या अनेक धर्मांचा अथवा प्रमुख धर्मांचा त्यांचा तौलनिक पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून परिपूर्ण अभ्यास झालेला असतो. यामुळे त्यांचा धर्मावर विश्वास ठेवून जगणा-यांपेक्षा व धर्माच्या नावावर धर्मवाद करणा-यांपेक्षा मानवतावाद, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मैत्री, सहिष्णुता व न्याय या मुद्यांचा चांगला व मार्मिक पद्धतीचा अभ्यास झालेला असतो. यामुळे ते समाजातलेच उच्चकोटीचे धर्मतत्त्ववेत्तेही असू शकतात. त्यांच्या आयुष्यात अंधश्रद्धा, फसवेगिरी, शोषण व लूटमार यांना कोणताच थारा नसतो. कारण त्यांनी त्यांचा धर्म स्वतः:घ्या बुद्धीने निवडलेला असतो किंवा त्यांनी त्यांची धर्म प्रणाली स्वतःपुरती तरी स्वतः तयार केलेली असते व तिच त्यांची जीवनप्रणाली व जीवनपद्धती असते.
आज आपण विज्ञानयुगात वावरत असताना आपण धर्मांतर करून स्वतःचा पारंपरिक धर्म सोडणारे पहातो. तसेच स्वतःच्या धर्मासाठी मरणारे व मारणारेही पहातो. तसेच धर्माच्या नावावर पोटे भरणारे पहातो, तसेच धर्माच्या नावावर राजकारण करून राजसत्ता भोगणारेही पहातो. तसेच संपूर्ण आयुष्यभर धर्माचे व्रतवैकल्य करून जगणारे पहातो , तसेच धर्माच्या नावावर गडगंज संपत्ती मिळवणारेही पाहातो. यामुळे आपण सरतेशेवटी ' ठेविले अनंते तैसेचि रहावे ' हि भूमिका घेऊन जगण्याचा प्रयत्न तरी करतो अथवा धर्माच्या नावावर लूटमार करून जगणारांच्या टोळीचे सदस्य बनतो व आपले जीवन जगतो.
पण प्रश्न हा पडतो की, ' धर्मात असा तत्वहीन विचार का व कसा निर्माण होतो? ' म्हणजेच धर्माला ग्लानी का येते ? हा होय. यांची अनेक कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे
१) धर्माचा पायाच कच्चा असणे हे होय.
धर्म म्हटला म्हणजे त्याला सर्वप्रथम धर्मसंस्थापक असावा लागतो. धर्मसंस्थापक असणे म्हणजे मूलभूत विचारसरणी असणे होय. पण काही धर्मांना धर्मसंस्थापकच नाही. असेही धर्म आज जगाच्या पाठीवर तग धरून आहेत. धर्माला धर्मसंस्थापक असला तरच त्याला एकाच विचार प्रणालीचा स्वतंत्र एक मूलभूत ग्रंथ असतो व एकच एक देव, भगवान व ईश्वर असतो. यामुळे त्या त्या धर्माची उपासना पद्धती व विचार सारखे असतात. चर्चा करतानाही ते प्रगल्भ विचारसरणीच्या तत्वाने करतात व धर्म समजून घेतात. अशा धर्मांमध्ये मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध व पारशी या धर्मांचा क्रमांक लागतो. तसेच याच धर्मांच्या अनुयायांची लोकसंख्या जगात मुस्लिम प्रथम, ख्रिस्ती द्वितीय तर बौद्ध तृतीय या क्रमांकावर आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे या धर्मांचा पाया पक्का आहे. कारण त्यांचा एकच देव, एकच ग्रंथ व एकच उपासना पद्धती आहे. कालांतराने त्यांच्यातही फूट पडून इतर पंथ पडले हे खरे, पण उपासना पद्धती, ग्रंथ व संस्थापक कधी त्यांनी बदलला नाही हेही तितकेच खरे आहे. मग प्रश्न हा पडतो की, मग या धर्मांची चिकित्सा करायचीच नाही का? तर त्याचे उत्तर होकारार्थी आहे. या धर्माच्या धर्मतत्वज्ञानाची चिकित्सा हि केलीच व झालीच पाहिजे. यात ख्रिस्ती व मुस्लिम धर्माच्या संस्थापकांनी चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य आपल्या अनुयायांना दिलेले नसले तरी, बुद्धाने ते दिलेले आहे. बुद्ध स्वतःच म्हणतात की, मी सांगतो म्हणून, मी बोलतो म्हणून सत्य मानून नका, त्यावर विश्वास ठेवु नका. तर तुमच्या बुद्धीला पटले, आवडले तरच त्याचा स्विकार करा. म्हणून तो जगातला पहिला परिवर्तनवादी धर्म ठरला व जगानेही मान्य केला.
पण ज्या धर्माला एकच एक धर्मसंस्थापक नाही, एकच एक धर्मग्रंथ नाही व एकच एक उपासना पद्धती नाही, तो धर्म नसून ते एका बुद्धीहिन लोकांचे संघटन आहे. तसेच जर एखाद्या धर्मात माणसाला माणूस म्हणून न स्वीकारता त्याला त्याच्या वंशावरून, वर्णनावरून, त्यांच्या सांस्कृतीक जीवनप्रणाली वरून किंवा त्याचा पोशाख व अन्न यावरून विभक्त समजले जात असेल, तरी त्या धर्माचा पाया कच्चा आहे हे समजून येते. तसेच एखाद्या धर्मात जात, पंथ यावरून माणसाला वागवले जात असेल किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात असतील तर, तो धर्म नसून धर्माचाच जीताजागता नरक आहे. तसेच ज्या धर्मात एका जातीतून दूस-या जातीत, एका पंथातून दूस-या पंथात, एका वर्णातून दूस-या वर्णात व एका धर्मातून दूस-या धर्मात जाण्यास बंदी आहे. तसेच ज्या जातीत, वर्णात व पंथात जो जन्माला आला त्याने तिथेच जगावे व मरावे अशी शिकवण जो धर्म देतो, तो धर्म नसून मानवतेचा तुरुंग आहे.
म्हणजेच धर्म हा दिशाहिन नसावा तर तो दिशादर्शक असावा. यामुळे धर्माला ग्लानी येते नाही.
२) धर्माला प्रचारक चांगले नसतील तर धर्माला ग्लानी येते. कारण एखादा धर्माचा पाया पक्का असतो. त्याला संस्थापक, ग्रंथ व देवही असतो, पण त्यांचे प्रचारक चांगले व शीलवान नसतात. तसेच ते जर आपल्या अनुयायांना ग्रंथ प्रामाण्य वाद, ग्रंथ उपासना, ग्रंथ पूजन, विशिष्ट नदी, वृक्ष, डोंगर , विशिष्ट देवाच्या व ग्रंथाच्या नावाखाली जर आपल्याच अनुयायांना व्रतवैकल्य, उपास तापास, मंत्रपठण व होमहवन करून, नरकाची भीती दाखवून त्यांची धर्माच्या नावाखाली त्यांच्या संपत्तीची राजरोस लूट करून, त्यांना भिकारी, दरिद्री व लाचार बनवत असेल तर, धर्माला ग्लानी निश्चित येते. यामुळे त्या धर्माचे अनुयायी तो धर्म सोडून दूस-या धर्मात तरी जातात किंवा स्वतःचा नवा धर्म तरी स्थापन करतात.
३) धर्मात मानवता व सहिष्णुता नसेल तर धर्माला ग्लानी येते. एखाद्या धर्मात मानवता वादाचा अभाव आहे किंवा एखादा धर्म इतर कोणत्याच धर्मातील माणसाला मानवतेच्या नजरेतून पहात नसेल, किंवा आपल्याच धर्मातील माणसाकडे जातींच्या, पंथाच्या व वंशाच्या नजरेतून पहात असेल तरी धर्माला ग्लानी येते. तसेच पूरातन काळातील इतिहासाचे पुरावे उकरून काढून व तो जूना ऐतिहासिक राग मस्तकात धरून माणसांचे मूडदे पाडत असेल, दंगल करून जाळपोळ करून जीवितहानी करत असेल व यालाच धर्म, धर्माची शिकवण किंवा धर्मासाठी मरणे आणि धर्म संस्कृती मानत असेल , जिहाद समजत असेल तर यामुळेही धर्माला ग्लानी येते.
म्हणून धर्म हि बंधूभावाने जीवन जगण्याची आदर्श जीवनप्रणाली असून तिच्यातील आजचा माणूस सुखी आहे. तिला धक्का लावण्याचा व धर्मतत्वां विरूद्ध आचरण करण्याचा माणसाने ज्या ज्या वेळी प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्याला त्याची किंमत मोजावीच लागलेली आहे. हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. माणसाने आपले जीवन सुखमय करण्यासाठी अनेक भौतिक सुविधा निर्माण केल्या, पण त्याला धर्म सुवर्णा आला नाही.हे त्यांचे माणूसपणाच्या वाटचालीतील आजवरचे अपयश आहे. ते ओझे डोक्यावर घेऊनच तो आपली वाटचाल आजवर करतो आहे. यातून माणूस जेंव्हा शहाणा होईल तेव्हांच तो परिपूर्ण माणूस होईल. म्हणजेच आजचा माणूस अजून परिपूर्ण माणूस बनला नसून, त्याची माणूस बनण्याची क्रिया सुरूच आहे, असे मानायला व म्हणायला कोणतीही आजतरी हरकत नाही.







