अंबाजोगाई (प्रतिनिधी):
अंबाजोगाई: दि. २० ऑक्टोबर २०२६ तालुक्यातील उजनी येथील शांतिदूत बुद्ध विहार, भीमनगर येथे आज (२० ऑक्टोबर २०२६) धम्मचक्र प्रवर्तन दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली, पार्वतीबाई गायकवाड आणि ग्रामपंचायत उजनीच्या उपसरपंच कालिंदा मस्के यांच्या हस्ते संयुक्तपणे पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत श्रीहरी गायकवाड यांनी केले. तसेच राजकुमार हजारे साहेब आरोग्य निरीक्षक बनसारोळा यांच्याकडून शांतीदूत बुद्ध विहाराला एक मोठी घड्याळ सप्रेम भेट मिळाली त्यामुळे साहेबांचे मनःपूर्वक स्वागत.या सोहळ्यात भीमनगर येथील समस्त बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुक्राचार्य गायकवाड, दगडोबा गायकवाड, धोंडीराम गायकवाड, धनराज मस्के सर, यशोदीप गायकवाड, सुरेश मस्के, बळीराम मस्के, भानदास कांबळे, दत्तराव गायकवाड, संदिपान गायकवाड, दिलीप मस्के तसेच कांताई गायकवाड, शितल गायकवाड, शीलाताई मस्के, स्वाती मस्के, अनिता गायकवाड, सुस्मिता मस्के, गंगासागर मस्के, आशाबाई घनगाव, रंजनाबाई गायकवाड, जमुनाबाई गायकवाड, लक्ष्मीबाई मस्के, नीताबाई गायकवाड,संगीता सावंत, गुजाबाई गायकवाड, ललिताबाई म्हस्के, आदींसह परिसरातील महिलांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.







