उल्हासनगर प्रतिनिधी : प्रदीप जाधव
उल्हासनगर : दि. २६ ऑक्टोबर २०२६ उल्हासनगर येथील अशाळे पाडा परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील नागरिकांनी व सहभागी स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून कला, संस्कृती आणि पारंपरिक उत्सवाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आज बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळ्यामुळे अशाळे पाडा परिसरातील नवरात्रोत्सवाला विशेष रंगत आली.







