बीड प्रतिनिधी
बीड : दि. २३ ऑक्टोबर २०२६ गेल्या अनेक दिवसांपासून बीड शहरातून बाहेर गावी जाण्यासाठी एस टी बसमध्ये प्रवास करत असताना प्रवासादरम्यान सोन्याची चोरी करणाच्या घटना घडत असताना चोरी करणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, तिच्याकडून तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त** करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
प्रवासादरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीची चर्चा होत आहे.







