आमदार डॉ.हिकमतदादा उढाण यांच्या उपस्थितीत घनसावंगी येथे जाहीर प्रवेश
जालना प्रतिनिधी
राकिशन अवधूत
सुखापुरी प्रतिनिधी : दि. १७ सप्टेंबर २०२६ अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या दलित आघाडी सेलचे अंबड तालुकाध्यक्ष दीपक पंडित पटेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. हिकमतदादा उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात जाहीर प्रवेश केला.घनसावंगी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार डॉ.हिकमतदादा उढाण यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
कुक्कडगाव परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले दीपक पंडित पटेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कुक्कडगावसह अंबड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच गावागावांत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक करण्यासाठी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. हिकमतदादा उढाण यांनी नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रवेश कार्यक्रमास शिवसेना अंबड तालुका संघटक अशोक बोटे,तालुका उपसंघटक राजेंद्र मोताळे, शिवसेना कार्यकर्ते आसाराम चौरे,सचिन पवार,निलेश पटेकर,कैलास गायकवाड, बालासाहेब गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कुक्कडगावातील या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





