परळी वैजनाथ
परळी वैजनाथ : दि. १७ सप्टेंबर २०२६ परळी वैजनाथ शहरात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले असून सध्या परळी वैजनाथ शहरात कुत्ताराज चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही महिन्यांपासून परळी वैजनाथ शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले आहे. परळी वैजनाथ शहरातील प्रत्येक चौका चौकात मोकाट कुत्र्यांची टोळी बसलेली दिसते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांच्या आणि शाळेतील लहान मुलांच्या हाताला पायाला या कुत्र्यांनी चावा घेतला असून परळी शहरातील आणि आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना आपला जीव मुठीत धरून परळी वैजनाथ शहरात वावरावे लागत आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी परळी वैजनाथ शहरातील विविध भागातील नागरिकांना कुत्र्यांनी चावल्यामुळे येथील परळी वैजनाथ ग्रामीण उप रुग्णालयात एकाचवेळी कुत्र्यांनी चावा घेतलेले रूग्ण दाखल झाले. परळी वैजनाथ शहरातील या कुत्र्यांच्या टोळ्यांनी सध्या परळी वैजनाथ शहरात दहशत निर्माण केली असून परळी वैजनाथ नगर परिषद मात्र या प्रकरणी डोळे मिटून शांत बसली आहे. परळी वैजनाथ शहरातील शाम प्रसाद मुखर्जी उड्डाण पूल चौक , बाजार समिती चौक, राणी लक्ष्मीबाई टावर, अरूणोदय मार्केट परिसर, मोंढा मार्केट परिसर, मौलाना अबुल कलाम आझाद चौक, परळी वैजनाथ शहरातील अशा अनेक ठिकाणी या मोकाट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असल्याचे मत परळी वैजनाथ शहरातील जनतेतून येत आहे. कालच्या घटनांनी मात्र परळी वैजनाथ परळी वैजनाथ नगर परिषद आणि अधिकारी यांना मोठे आवाहन दिले आहे. तेव्हा परळी वैजनाथ नगर परिषदेने परळी वैजनाथ शहरातील आणि ग्रामीण भागातून परळी वैजनाथ येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.




