दिपक गायकवाड सर
संपादक निर्भिड आवाज न्युज
दि. १६ सप्टेंबर २०२६ आपल्या भारतीय संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्षता हा शब्द समाविष्ट करून भारताच्या अखंडतेला एकसंघतेचा संदेश दिला. खरेतर धर्मनिरपेक्षता व समाजवादी हे शब्द सरनाम्यात ४२ व्या घटना दुरूस्तीने समाविष्ट केले आणि या घटना दुरुस्तीने विविध धर्म, पंथ व संप्रदायाने नटलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशाला अधिक मजबूत केले. तसेच या शब्दानी कोणालाही आपले मत दूस-यावर लादण्याचा व आपल्याच विचारांची हूकूमत गाजवण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. मग भारतीय संविधानाने याच सरनाम्यात आचार, विचार व बोलण्याचे दिलेले स्वातंत्र्य याला काय म्हणायचे? किंवा या स्वातंत्र्याचा व धर्मनिरपेक्षता या शब्दांचा मेळ कसा बसवायचा? हा प्रश्न अनेकांना पडतो व यामुळेच बुद्धीचा व आपल्या वर्तनाचा गोंधळ उडतो. याचे कारण म्हणजे आपल्या भारतीय अभ्यासक्रमात मूळातून नागरिकशास्त्र शिकवण्याची पद्धत नसल्याने व जे शिकवले जाते ते फक्त वीस मार्कांचेच असल्याने ८०% भारतीय नागरिक यापासून कायमस्वरूपी अज्ञानी रहातो. त्यामुळे त्याच्याकडून चूका या होणारच यात कोणताहि संशय नाही. नेमकी तिच गफलत जीवन जगताना भारतीय माणसाची होते आहे. यासाठी आपल्याला प्रथम धर्मनिरपेक्षता या शब्दाचा मूळातून व त्याच्या मूळात खोलवर जाऊन विचार प्रथमतः करावा लागेल. धर्मनिरपेक्षता हा शब्द धर्म + निरपेक्ष असा मिळून जोड शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ असा की, संविधान आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचे, त्याची उपासना करण्याचे स्वातंत्र्य प्रथमतः देते. पण इतर धर्माची घृणा, द्वेष, मत्सर, तिरस्कार किंवा धार्मिक जहरी टीका करण्याचे बंधन घालते. म्हणजेच थोडक्यात इथे धार्मिक स्वातंत्र्य आहे पण धार्मिक स्वैराचाराला बंधन आहे. तसेच स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे. मग एका धर्माच्या उपासकाने इतर धर्माची उपासना करावी का? हा सर्वात मोठा प्रश्न तयार होतो. तर त्याचे उत्तर संविधान होकारार्थी देते व त्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करते. पण कधी जर त्या उपासकाच्या इतर धर्माच्या उपासनेने त्याच्या धर्माच्या उपासना पद्धतीला धक्का लागत नसेल किंवा गंडांतर येत नसेल किंवा याहिपेक्षा त्याच्या स्वतःच्याच या इतर धर्माच्या उपासना पद्धतीने त्याच्या स्वतःच्याच धर्मनियमांच्या तत्वांची पायमल्ली होत नसेल, तरच त्याला संविधान उपासना स्वातंत्र्य देते. याहीपेक्षा सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे जर त्या वेक्तीच्या इतर धर्माच्या उपासना पदधतीने दोन धर्मात कलह, वाद निर्माण होत नसेल व युद्धसादृश्य परिस्थिती निर्माण होत नसेल तरच, संविधान त्याला इतर धर्माच्या उपासना पद्धतीला सहमती देते. म्हणजेच जर एखाद्याच्या उपासना पद्धतीने दोन धर्मात किंवा दोन समाजात शांततेचा व अखंडतेचा भंग होत असेल तर, त्या व्यक्तीची इतर धर्माची उपासना हि दोन समाजाला व राष्ट्रहिताल घातक असून, त्याने त्याला दिलेल्या संविधानिक स्वातंत्र्याचा दूराचार व स्वैराचार केला असा त्याचा अर्थ होतो. यासाठी संविधान प्रत्येक मानसाला बंधुभाव, समता व एकता याची शिकवण देते. म्हणजेच प्रत्येक इतर धर्माच्या व्यक्तीने इतर प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. म्हणजेच ज्या कोणी इतर धर्माच्या बांधवांनी इतर धर्माच्या बांधवाला आदरपूर्वक आपल्या सणाला किंवा उत्सवाला सन्मानपूर्वक बोलावले असेल किंवा आमंत्रित केले आसेल तर त्याला जाण्याचे व नजाण्याचे स्वातंत्र्य देते. पण जाणे म्हणजे पाण्यात टाकलेल्या ढेकळाप्रमाणे तेथे जाऊन विरघळून जाणे नव्हे. मग हि उपासना संविधानिक अडचण संविधान कसी पूरी करते? तसेच संविधान धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव माणणा-या माणसाची कशी पूर्तता करते? याचे उत्तर म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर होय. यासाठी संविधान त्याला जसे धर्म उपासना स्वातंत्र्य देते तसेच ते धर्मांतर स्वातंत्र्यही देते. म्हणजेच जर एखाद्याला आपल्याही धर्माची उपासना पद्धत आवडते व इतरही एखाद्या धर्माची उपासना पद्धत आवडते किंवा या दोन्ही उपासना पद्धतीने त्याच्या मनाला शांती व समाधान लाभते, तर त्याने या दोन्ही धर्मातील कोणत्याही, की जी उपासना पद्धत त्याला अधिक आवडते, त्या धर्मात त्याने सरळ धर्मांतर करावे व आपल्या उपासनेचा मार्ग मोकळा करावा. यामुळे कोणत्याही दोन धर्मात स्वतःच्या धर्म उपासना पद्धतीवरून वाद निर्माण होत नाही व देशाच्या अखंडतेचा व शांततेचा भंगही होत नाही. पण भारतीय धर्म तत्वाचींच पूर्वीपासून अवस्था अशी आहे की, भारतातील काही धर्म हे एकेश्वरवादी आहेत, तर काही अनेकेश्वरवादी आहेत. यामुळे पूर्ण भारतीयांच्याच उपासना पद्धतीचा भंग झालेला आहे. विशेष म्हणजे धर्म हि बाब मानवाच्या उत्कर्षासी व सम्यक कर्मासी जोडलेली असते. पण आपल्या भारतात धर्म हि बाब श्रद्धेशी, कर्मकांडाशी व आत्म्याशी जोडली गेली. ती विज्ञानासी कधी जोडलीच गेली नाही. यामुळे उपासना पद्धती अनेक देव व अनेक उपासना पद्धती झाल्या आणि याच्या विळख्यात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, धार्मिक बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता लोप पावत गेली. यामुळे भारतीय आपलेच संविधान समजून घेण्यातही कमी पडले. यासाठी संविधान अगोदर समजून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच प्रथम भारतीय व अंतिमतःही भारतीय म्हणून आपली ओळख निर्माण करणे कोणत्या भारतीयाला जमत नसेल तर, त्याने प्रथमतः भारतीय व नंतर धर्मिय बनने तरी आवश्यक आहे. पण ज्या भारतीय नागरिकाने प्रथम क्रमांक धर्माला दिला तर त्याला देश, धर्म जसा कळणार नाही, तशेच त्याला मानव, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव व धार्मिक बंधुता यातले काहिच कळणार नाही. आणि हे न समजून घेता फक्त देवभरोसे जीवन जगणे म्हणजे जीवन नाही. कारण या प्रवृत्तीने माणूस व जनावर यात कोणताच भेद रहात नाही. यासाठी धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव व धार्मिक बंधुता समजून घेणे म्हणजे जीवन समजून घेणे होय आणि हिच भारतीयांच्या दृष्टीने आज तरी काळाची गरज आहे.




