जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
परतुर: वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी परतुर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला .
या बैठकीमध्ये संघटनात्मक बाबी, पक्षाचे आगामी नियोजन तसेच विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे आयोजन पुर्व जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी केले तर यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खरात जिल्हा सचिव शेख जमीर भाई हनुमंत मोरे किशोर तुपे समाधान तोडगे ,बाबासाहेब गालफाडे सतीश पट्टेकर अँड .शुभाष चाबूस्कवार रामचंद्र पानवाले शेषराव शिनगारे गौतम खंडागळे सचिन भदर्गे गोकुळ शिनगारे स्वप्निल पहाडे दीपक हिवाळे दिलीप बाळू गाते साळवे प्रदीप साळवे रुपेश पहाडे विकास पहाडे सागर पहाडे राहुल पहाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



