कल्याण प्रतिनिधी
प्रदीप जाधव
उल्हासनगर : दि. २६ सप्टेंबर २०२६ उल्हासनगर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख नितीन भालेराव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत MRTP कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे. तसेच सार्वजनिक नाली-गटारे बंद करण्याच्या प्रकारांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांच्या समस्या प्रशासनाने गांभीर्याने घेऊन संबंधित प्रकरणांची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका नितीन भालेराव यांनी मांडली आहे.




