प्रदिप जाधव
ठाणे प्रतिनिधी
कल्याण : दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी शील फाटा–कल्याण रोडवर आज वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचण्यास विलंब होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



