परळी वैजनाथ : दि.२७ सप्टेंबर २०२६ राष्ट्रीय वर्षा वास धम्म प्रवचन मालिका निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने परळी वैजनाथ शहरातील मिलिंद नगर येथील नालंदा बौध्द विहार येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आद.एस बि.मोरे साहेब व आद. प्रा.श्रीपती वाघमारे सर यांनी चार ब्रह्म विहार व भाद्रपद पोर्णिमा या विषयी प्रवचन व सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका सरचिटणीस यशपाल बचाटे,कार्यालयीन सचिव अभिमन्यू दादा घोबाळे, तालुका संघटक नामदेव दादा मुंडे, संस्कार सचिव शानिकराव जगताप दादा,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महिला तालुका अध्यक्षा आद.प्रजावती ताई कांबळे यांनी केले अध्यक्षस्थानी ललिता ताई लोंढे व त्यांच्या परिवाराच्या वतीने खीर दान करण्यात आली, ग्रंथ वाचन महिला शहर अध्यक्षा शोभा ताई गोदाम, महिला पदाधिकारी अलका ताई काळे, आभार तालुका प्रचार पर्यटन उपाध्यक्ष जयपाल भय्या पाचांगे यांनी मानले मोठया प्रमाणात उपासिका उपासक उपस्थित होते, शेवटी सरनातय होऊन कार्यक्रम संपन्न झाला





