बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा : दि. १७ नोव्हेंबर २०२६ बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा तालुक्यातील आगेफळ येथे समता सैनिक दलाच्या सैनिकांना प्रमाणपत्र वितरण व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ साळवे व जिल्हा संघटक सैनिक डिव्हिजन ऑफिसर सुधाकर लहाने यांनी उपस्थित सैनिकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात आगेफळ येथील धम्मदीप बुद्धविहार येथून रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने सैनिकांनी सलामी दिली. त्यानंतर रॅली मार्गक्रम करीत पुन्हा धम्मदीप बुद्धविहार परिसरात पोहोचली.
यावेळी समता सैनिक दलाचे महत्त्व, संघटनेची ध्येयधोरणे, शिस्त, सामाजिक बांधिलकी, बंधुता आणि समाजाच्या संरक्षणासाठी सैनिकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजविण्यासाठी सैनिकाने कटिबद्ध राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सैनिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून यावेळी समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर प्रवीण खरात, समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष शिवानंद खरात, समता सैनिक दलाचे तालुका सरचिटणीस दीपक पाखरे, समता सैनिक फोर्स किरण साळवे, आगेफळ येथील समता सैनिक दलाच्या सैनिक लता बाजीराव खरात, कमल
प्रत्येक अशोक गवई, वंदना सुहास खरात, नीता राजू जाधव, विमल दिलीप गवई, संगीता कोंडीबा खरात, मनीषा गजानन खरात, संगीता अरुण खरात, शांताबाई जयमित्र वाकोडे, कमल रामराव खरात, प्रभावती संजय खरात, मनीषा समाधान खरात, तसेच चांगेफळ येथील महिला सैनिक मालताबाई शेजुळ. सह पंचशील मित्र मंडळ आगेफळ यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद खरात यांनी केले तर रामराव खरात यांनी आभार मानले.







