कल्याण प्रतिनिधी
प्रदीप जाधव
उल्हासनगर : दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी उल्हासनगर येथील अशाळे पाडा पंचशील बुद्ध विहारात वर्षावास निमित्त इंगळे परिवाराच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विहारात उपस्थित उपासक-उपासिकांना खिरीचे वाटप करण्यात आले.
वर्षावासाच्या पवित्र काळात सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत इंगळे परिवाराने खीरदान करून उपस्थितांना सेवा व दानाचा संदेश दिला. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, बौद्ध उपासक-उपासिका तसेच विहारातील अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इंगळे परिवाराच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. वर्षावासाच्या निमित्ताने अशा सामाजिक व सेवाभावी उपक्रमांतून मैत्री, करुणा आणि दानाची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.




