उल्हासनगर प्रतिनिधी
प्रदीप जाधव
कल्याण : दि. २५ सप्टेंबर २०२६ उल्हासनगर-४ येथील शासकीय रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सूचनेनुसार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी निमित्त बाह्यरुग्ण विभाग (OPD) बंद राहणार आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेषतः अचानक प्रकृती बिघडलेले रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांनी OPD बंद असल्यास नेमके कुठे उपचार घ्यावेत? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन सेवा सुरू आहे की नाही, तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांनी कोणत्या विभागाशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, याबाबत स्पष्ट सूचना लावणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सणाच्या दिवशीही आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचार मिळणे गरजेचे असल्याने प्रशासनाने याबाबत तातडीने स्पष्टता द्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.



