मंठा प्रतिनिधी
भीमचंद्र प्रधान
मंठा : दि. ०८ सप्टेंबर २०२६ जालना जिल्हा युवक महोत्सवाचे उद्घटन करण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा युवक महोत्सव २०२६ चे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर चे कुलगुरू उपास्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री व तथा राज्यमंत्री सौ. मेघनाताई सकोरे (बोर्डीकर) या उपस्थितीत होत्या.
या वेळी संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, उपाध्यक्ष डॉ. कुणाल दादा आकात, माजी बीसीयुडी संचालक डॉ. भागवत कटारे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, संस्थेचे संचालक गोविंदराव थिटे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे, जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, अधिसभा सदस्य डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, प्रा. हरिदास सोमवंशी, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, संयोजन समिती सदस्य डॉ. दिलीप महालिंगे, डॉ. किशोर शिरसाट, डॉ. समाधान इंगळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. बापू सरवदे, डॉ. गजानन मुळे, डॉ. विशाल अवसरमोल, डॉ. पांडुरंग नवल, डॉ. भारत धोत्रे तसेच दोन्ही महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.
युवा शक्ती हीच आपली खरी ताकद आहे या मार्फत आपण आपली स्वप्न ही साकारू शकतो असे मत सौ. मेघनाताई बोर्डीकर यांनी मांडले. या जिल्हा युवक महोत्सवात मुलींचे वाढते प्रमाण हे एक आनंदाची गोष्ट आहे. या जिल्हा स्तरावरून आपण राज्य व राष्ट्रीय स्तरावर कलावंत घडावे अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविक केले त्यात ते म्हणाले की या युवक महोत्सवात जिल्ह्यातून ६९ महाविद्यालयातील ५८१ कलावंतांनी सहभाग नोंदविला. या मध्ये २९२ मुले तर २८९ मुली यांचा सहभाग आहे. तसेच १९३७ मध्ये याच परतूर तालुक्यात पहिले मराठवाडा मुक्ती संग्राम चे अधिवेशन झाले होते असेही ते म्हणाले.
डॉ. समाधान इंगळे यांनी या वेळी कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन केले तर प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी आभार मानले. या उद्घाटन सोहळा पूर्वी शोभायात्रा काढण्यात आली तसेच विद्यापीठ ध्वज मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते फडकिवण्यात आला. या मध्ये डॉ. नेताजी मुळे यांनी या वेळी कार्यक्रमाचे संचालन केले.
कलावंत हीच खरी ओळख
कलावंत व कलेवरची त्याची श्रद्धा हीच खरी ओळख असते. कोणत्याही कलावंताला जात, धर्म, प्रांत, भाषा अशा प्रकारच्या चौकटीत अडकून ठेवता येणार नाही असे कुलगुरू डॉ. फुलारी सर त्याच्या अध्यक्षीय समारोपात म्हणाले. तसेच त्यांनी विद्यापीठ उपस्थीती व कॉपीमुक्त परीक्षा या बाबतीत विद्यापीठ कोणाचीही गय करणार नाही असेही ते म्हणाले. सध्याच्या युवा पिढीने मोबाईल व रोल लाईफ मधून बाहेर पडावे व रिअल लाइफ कशी असावी या कडे लक्ष केंद्रित करावे आणि आपले स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे असेही ते म्हणाले.
परतूर शहराचा ऐतिहासिक वारसा: कपिल आकात
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परतूर मध्ये आमच्या संस्थेने १९९४ साली केंद्रीय युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते. आता तब्बल ३२ वर्षानंतर होत असलेला हा युवक महोत्सव अधिक स्मरणीय करू आणि या महोत्सवाचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा असे संस्थेचे सचिव कपिल भैया आकात म्हणाले.






