दिपक गायकवाडसर
निर्भिड आवाज न्युज संपादक
दि. १४ सप्टेंबर २०२६ अनुसूचित जातीच्या उपवर्गिकरणाच्या मागणीला जवळजवळ साडेसात दशकानंतर सुरवात झाली. यामुळे आजपर्यंतच्या सांघिकतेला व बंधूत्वाला तडा गेला. जे पिढ्यांपिढ्या एकमेकांचे शेजारी म्हणून राहिले व एकमेकांचे बंधू म्हणून वावरले ते आज एकमेकांचेच नव्हे तर एकमेकांच्या महामानवांचेही विचार पायदळी तूडवण्यास सज्ज झाले. विचारांचे युद्ध झेंड्यांच्या रंगापर्यंत गेले व माकडाप्रमाणे सारेच आपला खेळ दाखवू लागले. यातून बंधूभाव तर तुटलाच पण, यातून बोलण्यातला व वागण्यातली सम्यकताही लोप पावली. यामुळे एक बरे झाले हा वाद व ज्याला आपण बंधूभाव म्हणत होतो याचा इतिहास तपासण्याचा योग माझ्यासह सर्वच संशोधकांना व विचारवंताना आला व संधीला वाव मिळाला. या वादाचे मूळ आजचे नाही तर ते फार म्हणजे इ.स. ११२९ वर्षापासूनचे आहे. कारण याच सालात महारांना बेदरच्या बादशहाने मुंगी पैठण येथे ५२ हक्कांची सनद दिली होती. ( संदर्भ :- डॉ. आंबेडकर, लेखन व भाषणे, खंड १९, पृ. ४८० ) यात महारांना गावकीच्या गावगाड्यात हक्क व अधिकार मिळाले. तसेच आजचे हाडकी व हाडोळा या जमिनी कसून पोट भरण्यासाठी वतन म्हणून महारवाड्या लगत मिळाल्या. जेणेकरून महारांना आपल्या जमिनीची देखभाल व मशागत करणे सोपे जाईल. पण हेच मांगाचे पिढ्यांपिढ्याचे दुखणे झाले. महारांची पोटजात म्हणून मांतग व रायरंद यांना ओळखले जाते. यामुळे मात़ंगाचा समज असा झाला की, महारांची आपण पोटजात व लहान भाऊ असताना महारांनी जमिनी व ५२ हक्कांची सनद स्वतः करिताच मिळवली. त्यावेळी त्यांना आपला लहान भाऊ व आपल्या शेजारचा भाऊ का दिसला नाही? तसेच या बावन हक्कांच्या सनदेने जर महाराच्या घरी लग्न निघाले तर मांगांनी त्यांच्या कार्यात सरपणफाटा पोचता करावा व त्या मोबदल्यात महारानी मांगाला उचलता शिदा देण्यात यावा. असाही एक हक्क होता. म्हणजे महार गावचा नौकर व आपण महारांचे नौकर. हेच गणित गावच्या गावगाड्यात येसकरकीच्या बाबतीत होते. गावच्या येसकरकीची काठी ही नेहमी महारवाड्यातच फिरली जायची. ती काठी प्रत्येक वर्षी एका महाराच्या घराकडून दूस-या महाराच्या घराला दिली जायची व ते महाराचे घराणे तेवढ्या वर्षापूरते महारवाड्याचे नायक व्हायचे. पण हि काठी शेजारच्या मांगाकडे कधी गेलीच नाही व त्यांना तो मान कधी मिळालाच नाही. एवढेच नाहीतर महारांनी गावकीकडून मागून आणलेले धान्य, भाकरी महाराला वाटले तर तो एखाद्या मर्जीतल्या मांगाला उरली म्हणून देण्याचा हक्क होता. म्हणजे यातही त्याला वाटा नव्हता. गावच्या चावडीला महाराला जेवढा मान होता त्याच्या कणभरही मांगाला नव्हता. एवढेच नाही तर जर दोन गावांचा शिवेच्या सरहद्दीवरून वाद झाला तर, दोन्ही गावचे महार एकत्र येऊन ते तो वाद मिटवित होते. कारण गावच्या बांद वरूळ्यांवर बारीक लक्ष ठेवणे हे महाराला त्याला मिळालेल्या सनदेने दिलेला हक्क होता. तसेच निरोप देण्याचे, गावात कोणाचे भांडण झाल्यास त्याचा न्याय करण्याचेही काम महाराचेच होते. यामुळे संपूर्ण कावकीचे काम महाराकडे यायचे व गावच्या माणसाला हरघटकीला महाराची गरज लागायची. तशी गरज मांगाची गावाला कधीच लागली नाही. यामुळे मांग गावाच्या गणतीतही नव्हता. याचे दु:ख व शल्य मागांना कायम बोचत व टोचत राहिले. यातूनच महाराचे त्याने कधीच भले व्हावे असे चिंतले नाही. तो नेहमीच महारावर मनातल्या मनात जळत व तळमळतच राहिला. येवढेच नाही तर ब्रिटिश काळात महारांनी अधिकच प्रगती केली. महारांनी त्यांच्या बापाच्या सांगण्यावरून शिक्षण घ्यायला सुरुवात केली. यामुळे त्याची सरकारी खात्यात नौकरीचीही सोय झाली. तसेच डॉ. आंबेडकरांनी आपल्या समाजला उद्देशून १९३२ मध्ये ‘ शहराकडे चला ‘ असा संदेश दिला. महारांनी त्याचेही अनुकरण केले. यामुळे महारांच्या प्रगतीत अधिकच भर पडली. याच काळात इंग्रजांनी फाशीची शिक्षा देण्यास मांगाला नेमले. कारण या पापी नौकरीची पात्रता केवळ त्याच्याकडेच होती. कारण याची मुख्य पात्रता म्हणजे त्या इसमाला फाशीचा नाडा स्वतः वळता आला पाहिजे. मांगाचा तो पारंपरिक धंदा असल्याने त्यांचाच त्यावर पहिला हक्क झाला. पण या नौकरी विषयी ‘ महारांचा इतिहास ‘ लिहिणारे ‘ अनिल आठरे ‘ लिहितात की, महाराला फाशी द्यायचा हूकूम असल्यास फाशी देणा-या मांगाला विशेष आनंद व्हायचा. तो मोठ्या खुशीने फाशीचा नाडा वळायचा व महाराला फाशी देतानाही तो मोठ्या खुशीत दिसायचा. त्याचा हा आनंद म्हणजे त्याच्या पूर्वजात दुखण्याला औषधच होते. यामुळे हा मातंग समाज डॉ आंबेडकरांच्या चळवळीतही फारसा दिसला नाही.उलट हे त्यांचे अज्ञान होते असा जर कोणाचा समज असेल तर तो त्याचा गैरसमज आहे. कारण याच काळात डॉ आबेडकरांना देवीदासराव नामदेवराव कांबळे, ता. पाथ्री, मैहलामाळी वाडा, जि. परभणी ( निजामस्टेट) याने दि. ३०/ ५/१९४१ रोजी एक पत्र लिहिले आहे व हे पत्र ‘ डॉ आंबेडकर लेखन व भाषणे,खंड – २०, पृ. ३४७ वर समाविष्ट केलेले आहे. या पत्रात हा तरुण सुरवातीलाच ‘ मी मराठवाडा भागातील मातंग समाजातील पहिला विद्यार्थी असून मातंग समाजातील सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर असल्याचे नमूद करतो. तसेच या पत्रात या तरूणाने डॉ आंबेडकरांवर एकूण आठ आरोप केलेले असून, त्यातील सहावा आरोप आजच्या मातंग समाजाच्या नेत्यांच्या उपवर्गिकरण मागणीशी तंतोतंत जूळणारा आहे. तो आरोप असा की, ” अस्पृश्य समाजात शिकलेले व पुढे गेलेले महार लोक आहेत. हे स्वार्थी व आपमतलबी असून इतर समाजातील लोकांस पूढे जाण्यास व सुधारण्यास वाव देत नाहीत ” तसेच याने डॉ आंबेडकरांवर असाही आरोप केलेला आहे की, ” म्हणून मातंग परिषद मध्यप्रांताने आंबेडकर फक्त महार समाजाचे पुढारी आहेत, मातंग समाजाचे नाहीत असा ठराव पास केला. ” तसेच हा तरुण बाबासाहेबांना धमकी देतो की, ” मी पंधरा दिवस वाट पाहिन. उत्तर न आले तर मी असे समजेन की, आपला मार्ग निराळा व माझा मार्ग निराळा. ” यावरूनही महार समाजाविषयी व त्यांच्या बापाविषयी या मातंग समाजाच्या मनमस्तकात किती पराकोटीचा द्वेष भरलेला होता हे समजून येते. एवढेच नाहीतर याच मांगानी डॉ.आंबेडकरांच्याच विरोधात महाराष्ट्रात एक मांतग परिषद घेऊन, त्या परिषदेला शंकराचार्यांना आमंत्रित करून, त्यांचे सभामंडपात पाय धुवून ते पाणी सभामंडपातील प्रेक्षक मांगाना तिर्थ म्हणून वाटले होते व तेही मनोभावे प्याले होते. एवढेच नाहीतर या शंकराचार्यांना मातंग परिषदेतर्फे मानपत्र देऊन त्यात ” आम्ही तुमच्या पायाचे दास आहोत.” असे नमूद केले होते. या वरील सर्व इतिहासावरून हे सहजच समजून येते की, जो समाज बाबासाहेबांचा कधीच झाला नाही, तो समाज बाबासाहेबांच्या लेकरांचा काय होईल? हा मोठा प्रश्नच आहे. एवढेच नाहीतर जे अण्णाभाऊ साठे डॉ आंबेडकरांच्या समकालीन होते पण, कधी उभ्या आयुष्यात बाबासाहेबांना राजगृहावर जाऊन भेटले नाहीत. उलट बाबासाहेबांच्या विरोधी गटात आयुष्यभर काम करून, बाबासाहेबांच्या चळवळीविषयी कधी कोणत्या भाषणात शब्द काढला नाही याला काय म्हणावे? बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर कितीही जग बदल घालूनी घाव म्हणण्याच्या वल्गना केल्या म्हणून काय जी बुंदसे गयी ती हौदसे येणार आहे. तेंव्हा आजच्या बौद्ध समाजाने या समाजावर राजकारणापासून भोतमांगे प्रकरणापर्यंत व समाजकारणा पासून साहित्य क्षेत्रापर्यंत कितीही उपकार केलेतरी हा समाज त्याचे उपकार ठेवील का? हा मोठा प्रश्न आहे. तसेच जो समाज पिढ्यांनपिढ्या दूस-यांच्याच पायाचा दास होत आलेला आहे, तो समाज पिढ्यांनपिढ्या आजच्या बौद्धांशेजारी राहून सुद्धा, ज्याला रंग नाही पण गुण आला नाही, तो बौद्धांचा व बौद्धांच्या बापाचा कधी होईल का? हाही एक प्रश्न आहे. याचा विचार मी करण्याऐवजी हा लेख वाचणारांनीच स्वतःच्या मनाला विचारूनच करावा असे मलातरी वाटते. कोणाला काय वाटते हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, मनाला व प्रज्ञेला काय वाटते हेच आजतरी खरे आहे.





