जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि. २९ सप्टेंबर २०२६ अंबड तालुक्यातील लखमापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय समितीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत शालेय समितीच्या अध्यक्षपदी महादेव रावडे, तर उपाध्यक्षपदी विक्रम कासार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
शालेय समितीची निवड प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जोगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी शालेय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांच्या सर्वानुमते अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी लखमापुरीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर तारगे, उपसरपंच सुनील गाडे, किशोर कांबळे, अतुल गाडे, मच्छींद्र काळे, संतोष ठाणगे, प्रकाश भापकर, विश्वास कासार, प्रशांत कासार, शांतिलाल अवधूत, कैलास भापकर, रमेश भापकर, शिवा गोरे, कुलदीप कवडे, बाळू गाडे, कलिंदर कासार, नवनाथ मराठे, लहू अवधूत, बाळू कासार, विक्रम तांदळे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष महादेव रावडे व उपाध्यक्ष विक्रम कासार यांचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शालेय समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





