अंबाजोगाई प्रतिनिधी
महेंद्र गोदाम
अंबाजोगाई : दि. २९ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र शासनाचा इतर मागास व बहुजन कल्याण विभाग आणि भटके-विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रनेता से राष्ट्रपिता अभिवादन – भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अंतर्गत घाटनांदूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात विशेष शिबीर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या वतीने सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील 80 ते 90 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिरात उपलब्ध झालेल्या प्रमुख सुविधा व सेवा:
दाखले व प्रमाणपत्रे: जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी व उत्पन्नाचे दाखले.
आरोग्य सुरक्षा: आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी.
शासकीय योजना: शिष्यवृत्ती, वसतिगृह योजना आणि घरकुल योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया.
प्रशासकीय व स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती:
या शिबिरास उपविभागीय अधिकारी (SDO) दीपक वंजाळे, तहसीलदार विलास तरंगे, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी मंजुषा घुगे, सरपंच महेश वैजनाथ गारठे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता काका जाधव, तलाठी अधिकारी फुलचंद शिरसाट व निर्मल चव्हाण, ग्रामविकास अधिकारी योगेश शेळके, कृषी सहाय्यक दीपा मुंडे, कुलकर्णी मॅडम, धनश्रीडॉक्टर माधवी पाचवे वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर गणेश माले प्रवीण पारवे, गणेश आरोग्य सेवक यांच्या चव्हाण, अश्विनी जगाये, सतीश जाधव यांच्यासह महसूल, आरोग्य व समाज कल्याण विभागाचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांची प्रमुख उपस्थिती होती.
”वेळ अन् पैशांची बचत” – लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त
शासकीय योजना आणि महत्त्वाचे दाखले थेट गावातच उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. “आमच्या गावातच हे शिबीर आयोजित केल्यामुळे आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागल्या नाहीत. यामुळे आमचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचले,” अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिली.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल कर्मचारी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळ: घाटनांदूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शिबिरात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करताना महसूल व तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी.





