दिपक गायकवाडसर
निर्भीड न्यूज संपादक
अकोले : अकोले तालुक्यातील कोतुळ या गावाततील नालंदानगर मध्ये तीन वर्षापूर्वी बांधलेल्या बुद्ध विहारात आज ३ आक्टोबर या दिवशी सकाळी सकाळी सुर्यकिरणांचा वर्षाव बुद्ध मुर्तीच्या चरणी हजारो भाविकांना पहाण्यास व अनुभवण्यास मिळाला. खरे तर हा अनुभव गेल्या वर्षीच अनुभवण्यात आला व हि बातमी वा-यासारखी पंचक्रोशीत व तालुक्यात पसरली. पण तो क्षण तासाभराचाच असल्याने, तो परत प्रत्यक्षदर्शनी अनुभवण्यासाठी परत एक वर्षाचीच प्रतिक्षा करावी लागली व तो योग परत यावर्षी जूळून आला. सुर्याची किरणे व हा अलौकिक योग पहाण्यासाठी परिसरातून व तालूक्यातून हजारो भाविक सकाळपासूनच जमली होती. तसेच या कार्यक्रमाचे आगोदरच नियोजन करण्यात आलेले असल्यामुळे, मलाही निर्भीड न्युज चॅनेलचे संपादक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यामुळे मलाही हा सुवर्णक्षण व निसर्गाचा अदभूत किमयेचा चमत्कार सर्वांच्या साक्षीने अनुभवता आला. बुद्ध मुर्तीवर हा सुर्यप्रकाश बरोबर सात वाजून पाच मिनीटांनी पडायला व बुद्धमूर्ती प्रकाशमान व्हायला सुरवात झाली व या आनंदातच जमलेल्या भाविकांनी मनोभावे एका आवाजात ‘ बुद्धं शरणं गच्छामी ‘ हे पंचशील स्वर गायला सुरवात केली. यामुळे संपूर्ण परिसर क्षणात भक्तीमय बनला व सर्वच भाविक मनोभावे नतमस्तक होऊ लागली. ” तेथे कर माझे जूळती ‘ अशी अवस्था सर्वच जमलेल्या भाविकांची झाली. हा सात वाजून पाच मिनीटांनी सुरू झालेला प्रकाश बरोबर बुद्ध मुर्तीवर आठ वाजून दहा मिनिटे पर्यंत टिकला. यामुळे सर्वच भाविकांना वेरूळची आठवण झाली. कारण वेरूळच्याही एका लेणीवर असाच सुर्यप्रकाश पडत असतो, पण तो सायंकाळच्या वेळेस पश्चिम बाजूने पडत असतो. तर हा प्रकाश पूर्व बाजूने सकाळच्या प्रहरी पडत असतो. यामुळे ज्या भाविकांना हा सोहळा वेरूळला जावून पहाणे व अनुभवणे शक्य नाही ते ‘ हेच आपले वेरूळ ‘ समजून हा दर्शन सोहळा अनुभवत आहेत. यामुळे हे बुद्धविहार भाविकांच्या चर्चेत आले आसून, ते अकोले तालुक्यातील सर्वच बहुजन समाजाचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. तसेच ते थोड्याच दिवसात तमाम बौद्धांचे व तमामम भाविकांचे प्रेक्षणीय तिर्थस्थळ ठरेल यात शंकाच नाही.







