दिपक गायकवाड सर,
संपादक निर्भीड आवाज न्युज
सिन्नर :०२ऑगस्ट २०२६ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे १६ ऑगस्ट १९४१ रोजी आले होते व त्यांनी इंग्रज सरकारच्या ‘ जादा जूडी ‘ कायद्या विरोधात तिव्र नापसंती व्यक्त करून, त्याविरुद्ध आंदोलन पुकारले होते. याची आठवण म्हणून सिन्नर मधील तमाम सुज्ञ नागरिकांनी हा दिवस पदस्पर्श सोहळा म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. हे या सोहळ्याचे दूसरे वर्ष आसून,या सोहळ्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. दिपक गायकवाडसर व माजी नगरसेवक मा. प्रभाकर जाधव यांच्या कल्पनेतूून साकारलेल्या या सोहळ्यास आता चांगले जनशक्तीचे स्वरूप आलेले आसून तो सोहळ भव्य दिव्य करण्याचे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा कमिटीचे अध्यक्ष मा.आर.एन.जाधव हे होते. तसेच प्रतिष्ठीत मान्यवर व्यक्तींसह दीक्षा कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा व जेष्ठ उद्योगपती रावसाहेब आढाव, आरपीआयचे तालुका अध्यक्ष मंगेशभाऊ जाधव, जेष्ठ बौद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड, हरिष जाधव, राधू साळवे, जेष्ठ समाजसेवक मधुकर जाधव, सुनिल जाधव, बहुजन वंचित आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष प्रविण जाधव, अशोक घेगडमल, विजय फुलपगारे, रत्नाकर जाधव, नितीन शिरसाठ व अमीर शेख हे सर्व उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष,उदघाटक, प्रमुख वक्ते यांची नावे निश्चित करण्यात आली. तसेच आयोजक कमेटी, संयोजक कमेटी यांचीही स्थापना करण्यात आली. तसेच बॅनर,पोस्टर व पाॅम्पलेट याचे नियोजन करून व जेष्ठ उद्योगपती मा.रावसाहेव आढाव यांचा प्रेमाचा चहा पिऊन बैठकीची सांगता झाली.




