परळी वैजनाथ : दि. ०४ ऑगस्ट २०२६ परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे टोकवाडी ते डाबी, नागापूर,मांडेखेल, मोहा, बोधेगाव या ग्रामीण भागातील गावांना जोडणारा रस्ता नादुरुस्त झाला असून या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याकडे प्रशानाने दुर्लक्ष करत काना डोळा केल्याचे मत नागरिकांतून येत असून दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी परिसरातील नागरिकांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले.



