जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. २३ जुलै २०२६ अंबड तालुक्यातील हसनापुर येथील शेतकरी खंडु बाजीराव गडदे यांचे दोन्ही मुले रामेश्वर खंडु गडदे परमेश्वर खंडु गडदे हे दोन्ही सख्खे भाऊ मुंबई पोलीस दलात दाखल झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील हसनापुर येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या रामेश्वर खंडु गडदे व परमेश्वर खंडु गडदे या शेतकऱ्यांच्या मुलाने जिद, मेहनत , चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. हसनापुर येथील गरीब कुटुंबातील या दोन्ही सख्खे भाऊ यांनी मुंबई पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रामेश्वर गडदे आणि परमेश्वर गडदे यांचे आई वडील शेतकरी कुटुंबातील आहेत. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना पोलीस करण्याचे स्वप्न पाहिले होते. आई-वडिलांनी शेतात राबून त्यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. रामेश्वर गडदे आणि परमेश्वर गडदे यांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला. त्यामुळे दोन्ही भावाचे शिक्षण झाले. दोन्ही भावांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या या जोडीबद्दल हसनापुर चे सरपंच नितीन मिरकड , बंडु मुळे, रमेश मिरकड, भास्कर मिरकड, नारायण सातपुते , चेअरमन तुकाराम सातपुते, बाळु गडदे, गणेश गडदे, पांडुरंग गडदे, नारायण गडदे, त्यांच्या या यशामुळे हसनापुर गावा सह परीसरातील नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




