जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. २३ जुलै २०२६ रोजी गुरुवारी अंबड तालुक्यातील गोंदी येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. तसेच नीट च्या परीक्षेत झालेल्या गैर्यवराबाबत न्याय मागणाऱ्यासाठीसुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सकाळी ११ वाजता गोंदी येथील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व कृष्णा साबळे, सुरेश खरात, प्रमोद कोठारी, अशोक शिंदे, राजु पेंटर , अँड राहुल नरवडे, विठ्ठल शेळके, महेन्द्र खरात , परशिक शिंदे, अजय नरवडे, प्रेम खरात, गणेश शिंदे, हिरामण हराळे, आमोल नरवडे, शुभम शिंदे, संदीप नरवडे, गणेश जाधव, राजु शिंदे, अनुज खरात, निशीकांत शिंदे, दिपक दगडु खरात, दता वाघमारे, उमाकांत शिंदे, जगदीश वाघमारे, हनुमंत वाघमारे, दिनेश शिरसाट, आदी सहभागी होते. राष्ट्रगीत घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.




