पुणेप्रतिनिधी
निशा विसपुते
पुणे : दि. २० जुलै २०२६ पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या द्दितील खळवाडी परिसरातील पाईप लाईनचे काम दुसऱ्या वेळेचे सुद्धा अपयशी ठरले असून यापुर्वीही पहिल्या पाईपलाईनच्या खालून पाणी येत होतं म्हणून पाईप दुसरे टाकण्यात आले. या पाईप लाईनचे काम करत असताना त्याखाली कुठल्याही प्रकारचे सिमेंट काँक्रेटचे मटेरियल टाकलेले नाही तसेच पाईप टाकून झाल्यावरती त्याच पाईपलाईन खालून पाणी पुन्हा पाणी बाहेर येताना दिसत आहे. परिसरातील काम बाकी असून पुढील काम कशाप्रकारे होणार आहे याची काळजी खळवडी परिसरातील नागरिकांना लागली आहे. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी राहिलेले काम चांगल्या दर्जाचे करतील का ? असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना तळेगाव परिसरात चालू असलेल्या कामांची चौकशी किंवा ती दर्जेदार कामे करत आहेत का ? हे बघण्यासाठी वेळ नाही तेव्हा तळेगाव आणि खळवडी येथील सर्व नागरिकांनी जागृत राहून कामाची चालू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासून तक्रार करणे आवश्यक आहे संपूर्ण तळेगाव मध्ये भ्रष्टाचाराचे काम सुरू असून याप्रकरणी सर्व गावकऱ्यांनी एकजूट होऊन खालील क्रमांकावर तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे. संपर्क करा 98 22 70 97 80 व्हाट्सअप तक्रार करा आरटीआय





