सातारा प्रतिनिधी
शिरवळ ,ता.खंडाळा, जि.सातारा
सातारा : दि. १९ जुलै २०२६ खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे इस्कान टेम्पल यांचे वतीने भव्य आणि दिव्य अशी जगन्नाथ रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली.या रथयात्रेचा 2000 भाविकांनी लाभ घेतला.संपूर्ण शिरवळ शहरात रांगोळ्या काढण्यात आल्या अतिशय भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन भक्तगण तसेच वारकरी सांप्रदायाचे चिमुकले देखील
आनंदाने नृत्य करत यात्रेत सहभागी झाले. शिरवळमधे प्रथमच अशा भव्य आणि दिव्य यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. पळशी रोडवरून निघालेल्या रथयात्रेची सांगता केदारेश्वर मंदिराजवळ करण्यात आली. तसेच आलेल्या सर्व भावीकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.





