अभियानास प्रारंभ
जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. १९ जुलै २०२६ अंबड येथे उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाच्या जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज अंबड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या अभियानाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा, शाखा अंबड, जि. जालना यांच्या पुढाकाराने करण्यात आली.
या वेळी शहरभर फिरत्या रिक्षावर ध्वनीक्षेपक (भोंगा) लावून उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच विविध चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या परिसरात जनजागृती पत्रके वाटून व पोस्टर लावून समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याची, संविधानाने दिलेल्या आरक्षण हक्कांचे संरक्षण करण्याची आणि दि. २१ जुलै रोजी जालना येथे आयोजित उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या जनजागृती अभियानात भारतीय बौद्ध महासभा शाखा अंबडचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण अंबड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात हे अभियान पार पडले.
जय भीम! जय संविधान!
अभियानाचा शुभारंभ आज अंबड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या अभियानाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा, शाखा अंबड, जि. जालना यांच्या पुढाकाराने करण्यात आली.