ठाणे प्रतिनिधी
प्रदिप जाधव
कल्याण | प्रतिनिधी : प्रदीप जाधव
वालधुनी बुद्धभूमी बचाव आंदोलनाचा २५ वा दिवस; मुसळधार पाऊस, वारा असूनही आंदोलन कायम
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वालधुनी येथील बुद्धभूमी बचाव आंदोलन आज २५ व्या दिवशीही सुरूच आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही भंतेजींसह भीमसैनिक आंदोलनस्थळी ठामपणे आंदोलन करत आहेत. मात्र, एवढे दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन योगेश कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण : दि. १० जुलै २०२६ कल्वायाण येथील वालधुनी बुद्धभूमी बचाव आंदोलनाचा २५ वा दिवस; मुसळधार पाऊस, वारा असूनही आंदोलन कायम