एस.आय.आर. सर्वेक्षण अन् विद्यार्थ्यांचे शोषण
बीड प्रतिनिधी
बीड : दि. १० जुलै २०२६ महाराष्ट्रभर एस.आय.आर. सर्वेक्षणासाठी सत्ताधारी सरकार आणि शासनाने शिक्षकांवर जबाबदारी टाकली आहे. एस.आय.आर. सर्वेक्षणासाठी शिक्षकांवर जबाबदारी कितपत योग्य आहे कि अयोग्य याची सत्ताधारी सरकार आणि शासनाला बहुतेक कल्पना नसावी परंतू या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी पडत आहे. सरकार आणि शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आज रोजी शिक्षकांचा शुकशुकाट दिसत आहे. राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आणि शासनातील प्रशासकिय अधिकारी यांचे पाल्य हे मोठं मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेतात मात्र महाराष्ट्रात गोरगरीब लोकांचे पाल्य हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. या सर्व गोष्टींची कल्पना असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना जाणीवपूर्वक एस. आय. आर. सर्वेक्षणासाठी पाठवणे हे महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे एक षडयंत्र आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. म्हणून जिल्हा परिषद शाळांचा काटा काडू पाहणाऱ्या सत्ताधारी सरकारने केंद्र शासन आणि राज्य शासनाला मुठीत धरून शाळेतील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मोठी कोंडी केली आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची इच्छा नसतानाही त्यांना जबरदस्तीने एस.आय.आर. सर्वेक्षणासाठी पाठवले जात असल्याचे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे. तेव्हा त्ताधारी सरकारने आणि सरकारी बाहुली झाले शासनाने दरम्यान राजकीय वरदहस्त लाभलेला काही शैक्षणिक संस्थांमध्ये मात्र एस.आय.आर. सर्वेक्षणासाठी जबरदस्ती नाही मात्र जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जबरदस्तीने एस.आय.आर. सर्वेक्षणासाठी पाठवण्यात ये असल्याचे मत महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांमधून येत आहे शासनाच्या या दुतोंडी भुमिकेमुळे सामान्य जनतेचा मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. जर सरकार आणि शासनाला एस.आय.आर. सर्वेक्षण करायचेच आहे. तर हेच सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्यांना रोजगार मिळवून द्यावा जेधे करून शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. या सर्व बाबींचा सत्ताधारी सरकारने आणि त्यांच्या मुठीत असलेल्या केंद्र राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे.





