ठाणे प्रतिनिधी
ठाणे : दि. ४ जुलै २०२६ ठाण्यातील मीरा रोड परिसरात एका तरुणीच्या हत्येप्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. भावाच्या फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या जोडप्यामध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये उकळल्याचा आणि तव्यावर भाजल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.





