जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. ४ जुलै २०२६ जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे शहापूर येथील पुलावर बस क्रमांक एम एच १४ बी. टी. ३०२२ व बस क्रमांक एम एच १४ एम एच १७१५ या दोन बसेसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.
सदर अपघात आज दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी सकाळी अंदाजे ०९:१५ ते ०९:३० वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अरुंद पुलामुळे झाला अशी जनतेतून चर्चा आहे .सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे.





