अंबाजोगाई प्रतिनिधी
महेंद्र गोदाम
घाटनांदूर : दि. ७ जुलै २०२६ घाटनांदूर येथील बोगस विद्युत कामाविरोधात सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र आंदोलनाचा इशारा; लाचलुचपत प्रकरणानंतर महावितरण अंबाजोगाई विभाग चर्चेत घाटनांदूर येथील 33 KV सब स्टेशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आणि गावठाणातील हातोला फिटर व पूस फिटरच्या बोगस कामाबत सामाजिक कार्यकर्ते पप्यांपू जाधव यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग अंबाजोगाई यांच्याकडे लेखी अर्ज दिला होता.
मात्र याप्रकरणी स्थानिक अभियंता श्री. तारळकर आणि अंबाजोगाई विभाग यांच्यात “सेटलमेंट” असल्यामुळे आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप जाधव यांनी केला आहे.
अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे साहेब यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर संपूर्ण विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. “अंबाजोगाई विभाग पूर्णपणे भ्रष्ट झाला आहे” असा गंभीर आरोपही जाधव यांनी केला.
आत्मदहनाचा इशारा
हा प्रश्न मार्गी न लागल्याने पप्पू जाधव यांनी उद्या दि. 08.07.2026 रोजी घाटनांदूर ते 33 KV महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी महावितरण विभागाला लेखी कळवले असून त्याची पोचपावती देखील त्यांच्याकडे आहे.
मागण्या:
- घाटनांदूरचा कायमस्वरूपी लाईटचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा.
- बोगस काम करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.
- उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
या प्रकरणी महावितरण प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पप्पू जाधव यांनी दिला आहे.




