
परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ : दि. ७ जुलै २०२६ परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी परिसरातील घाटात दुचाकीचा अपघात झाला असुन या अपघातात संत सावतामाळी नगर येथील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
परळी शहरातील सावतामाळी नगर भागातील गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ हे दोन युवक अंबाजोगाईहुन परळीकडे येत असताना कन्हेरवाडी घाटात हॉटेल नंदनवन जवळ रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच.४४ ए ए ३०६४ चा अपघात झाला.यात ते गंभीर जखमी झाले. नागरीकांनी त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांचा मृत्यु झाला. या दुचाकीवर असलेला अन्य एक युवक गंभीर जखमी झाला आहे.




