अंबाजोगाई प्रतिनिधी
महेंद्र गोदाम
अंबाजोगाई : दि. ८ जुलै २०२६ अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने रूजू झालेले डॉ. सोमनाथ चोले आणि डॉ. मधुरा माचवे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीने परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. महेंद्र गोदाम पत्रकार ,राहुल कासारे, अमित रणखांब यांच्या उपस्थितीत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ सावंत मॅडम, आचार्य व ईश्वर यांच्या हस्ते दोन्ही डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
नवीन डॉक्टरांनी गावकऱ्यांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा मानस व्यक्त केला. गावातील नागरिकांनी नवीन डॉक्टरांच्या नियुक्तीचे स्वागत करत आरोग्य केंद्र अधिक सक्षम होईल अशी आशा व्यक्त केली.




