परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ : दि ५ जुलै २०२६ रोजी परळी वैजनाथ येथे भारतीय बौध्द महासभेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. ५ जुलै २०२६ रोजी भारतीय बौध्द महासभा बीड जिल्हा पूर्व परळी वैजनाथ तालुका,शहर, ग्रामीण, वार्ड शाखेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले या शिबिरात भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुक्यातील तालुका,शहर, ग्रामीण, वार्ड शाखेच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदवला भारतीय बौध्द महासभा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुकाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे सर , उद्घाघाटक भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व जिल्हाध्यक्ष आयु. बी.बी. धनवे सर यावेळी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरास मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा ऑडिटर ऑडिट कमिटी महाराष्ट्र राज्य आयु. युवराज मोरे सर , भारतीय बौध्द महासभेचे बीड पूर्वचे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आयु. एस. बी. मोरे सर, लाभले. आयु. युवराज मोरे सर यांनी शिबीरार्थींना भारतीय बौध्द महासभेच्या शाखेचे काम आणि हिशोब, भारतीय बौध्द महासभा पदाधिकारी आणि त्यांची जबाबदारी याविषयांवर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. तर आयु. एस. बी मोरे सरांनी भारतीय बौध्द महासभेची ध्येय, उद्दिष्टे , मिशन, कार्यकर्ता , प्रबोधन आणि आचारसंहिता या विषयांवर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. या शिबीरास प्रमुख उपस्थिती भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व जिल्हा हिशोब तपासणीस आयु. एम. वाय. काळे सर ,भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष आयु. डॉ. स्वप्निल महाळंगिकर, भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व जिल्हा संस्कार सचिव आयु. प्रा.डॉ.आर.डी. आचार्य सर, भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ तालुका कोषाध्यक्ष आयु. जे.के. कांबळे सर , या शिबीराचे स्वागताध्यक्ष भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ शहराध्यक्ष आयु. महादू सरवदे होते. तर या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आणि कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ तालुका प्रचार प्रसार उपाध्यक्ष आयु. जयपाल पाचांगे भारतीय यांनी केले. भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ शहर सरचिटणीस आयु. योगेश मुंडे, भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ तालुका पर्यटन उपाध्यक्ष आयु. दत्तात्रय बचाटे, भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ तालुका संघटक आयु. शहानिक जगताप, भारतीय बौध्द महासभा बीड पूर्व परळी वैजनाथ तालुका हिशोब तपासणीस आयु. बाबासाहेब पाचांगे यांच्यासह परळी वैजनाथ तालुक्यातील भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरास उपस्थित होते.






