ठाणे प्रतिनिधी
प्रदिप जाधव
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
अनेक ठिकाणी प्रवास करत असताना प्रवाशांकडे सुट्टे नसतात अशा वेळी प्रवाशांना प्रवासाचे तिकीट देऊन सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशाला रेल्वे स्थानकातील तिकीट देणारे कर्मचारी अडकवून टाकतात चिल्लर आणून द्या आणि बाकीचे पैसे घेऊन जा म्हणत प्रवाशांची गळचेपी केली जाते. यामुळे प्रवाशांना तिकीटातून परत मिळणारे पैसे तिकीट कर्मचाऱ्याला सोडावे लागतात किंवा सुट्टे पैसे उपलब्ध न झाल्याने विना तिकीट प्रवास करावा लागतो आणि याचा दंड त्या प्रवाशांना त्या तिकीटाच्या ५ पट १० पट भरावा लागतो. असाच प्रकार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर रेल्वे स्थानकात घडला असून १०० चे चिल्लर नाही म्हणून तिकीट कर्मचाऱ्यांने तिकीट देण्यास नकार दिला. शिवाय १० रू चे चिल्लर तिकीट काउंटरवर उपलब्ध नाही असेही प्रवाशांना सांगण्यात आले. तिकीट कर्मचाऱ्यांकडे सुट्टे नसल्यामुळे प्रवाशांनी काय रेल्वे प्रशासनास विना तिकीट प्रवास केल्यावर ५०० रूपये दंड भरायचा का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, रेल्वे मंत्रालयाने कोणत्याही मूल्याची वैध भारतीय नोट स्वीकारून आवश्यक ते सुट्टे पैसे परत देण्याची व्यवस्था रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर करावी, अशी भूमिका वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोय का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करून तिकीट खिडक्यांवर पुरेशा सुट्ट्या पैशांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.






