बुलढाणा प्रतिनिधी
प्रदिप जाधव
बुलढाणा : दि. ३ जुलै २०२६ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली (शेळगाव जहांगीर ) येथे बौध्द महिलेवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या एका तालुका नेत्याने रॉडने क्रूर हल्ला असून या हल्यात पीडितेचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत तिच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. आरोपीने पीडितेच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले आहे. पीडिता सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. यापूर्वी २६ जून २०२६ रोजी याच आरोपीने महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा दावा केला आहे.चार दिवस उलटूनही आरोपीला अटक झालेली नाही. स्थानिक भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या खासदारांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सरकारला सवाल “लाडकी बहीण” योजनेचा संदर्भ देत, ‘या दलित मुली तुमच्या लाडक्या लेकी नाहीत का?’ असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला आहे. या हल्ल्यातील आरोपीला अटक झाली नाही, तर बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दिपक केदार यांनी दिला आहे.




