उल्हासनगर प्रभाग क्र. १५ मध्ये नगरसेवकांचे दुर्लक्ष?
उल्हासनगरमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रभाग क्र. १५ मधील नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. याशिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.





