दिपक गायकवाड सर
संपादक निर्भिड आवाज न्युज
महाड सत्याग्रह हा मूळात दोन टप्प्यात झाला. त्यातला १९ व २० मार्च १९२७ हा पहिला टप्पा आणि २५ डिसेंबर १९२७ हा दूसरा टप्पा आहे. हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे. पहिल्या टप्प्यात चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क बजावून समता प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम होता. तर दूस-या टप्प्यात हिंदू धर्माला लागलेला कलंंक व त्या कलंकाने मानवी व्यवस्थेची ब्राम्हणी समाजाने केलेली गुलामी अवस्था मोडीत काढण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘ मनूस्मृती दहन ‘ याचा कार्यक्रम होता. यामुळे ज्या महाड सत्याग्रहातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या क्रांतीचे रणशिंग फुंकले त्यावर सविस्तर लेख लिहितानाही तो दोन टप्प्यातच लिहिला पाहिजे ,तरच या सत्याग्रहाचे मर्म समाजाला व वाचकांना मूळातून समजेल असे मला वाटते. सत्याग्रहासाठी डॉ आंबेडकरांनी महाडचीच भूमी का निवडली? या पाठीमागे कारण काय? हे प्रथमतः आपण जाणून घेतले तरच आपल्याला या सत्याग्रहाचे महत्व कळेल. खरे तर हा सत्याग्रह करण्याच्या अगोदर डॉ आंबेडकरांच्या मनात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा सत्याग्रह करून, पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठल नसून बुद्ध आहे हे सिद्ध करण्याचा व मंदिर प्रवेशाचा होता. पण हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात वेळ जास्त जाईल व चळवळ थोपेल यामुळे हा सत्याग्रह करावा की नाही या द्वंद्वात बाबासाहेब सापडले होते. सत्याग्रहासाठी योग्य जागा शोधण्याचा ते प्रयत्न करत होते. तसी त्यांची त्यांच्या संवगड्या बरोबर चर्चाही सुरू होती. नेमकी याचवेळी अनंतराव चित्रे यांनी एक बातमी बाबासाहेबांना दिली. ते म्हणाले की,”बाबासाहेब , अशी एक जागा आमच्या महाडला आहे. ती बोले ठरावाच्या कक्षेतही येते. ‘ कारण १९२३ साली रा.ब. सी. के. बोले यांनी मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये एक ठराव संमत करून, सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, पाणवठे अस्पशांना खुले केले होते. तसेच सुरबा टिपणीस महाड नगरपालिकेनेचे नव्याने अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनीही २/१/१९२४ रोजी ठराव क्रमांक ,६७ द्वारे महाड शहरातील सर्व सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले केले आहेत. हि माहिती चित्रेंनी बाबासाहेबांना देताच फोन बाबासाहेब ताडकन खुर्चीतून उठले. त्यांना एक नवी दिशा मिळाली. त्यांच्या चेह-यावर एक तेज चमकले. डोळे आनंदाने ओथंबून गेले व त्या आनंदाच्या भरातच बाबासाहेब चित्रेंना म्हणाले ” एवढीच मोठी बातमी तू मला आजपर्यंत सांगितली नाही?” कारण या बातमीने सत्याग्रहाचे सर्वच मनसुबे पूर्ण होणार होते. कारण यात वेळ फार कमी लागणार तर होताच पण यात विजयाची खात्री जास्त प्रमाणात होती. तसेच याी सत्याग्रहाचे चळवळीला गती तर मिळणार तर होतीच, पण चळवळही भरभक्कम होऊन तिला बुलंद करभण्यासाठी जलद गतीही मिळणार होती. यामुळे बाबासाहेबांनी त्या जागेला होकार दिला. तसेच हि महाडची जागा निवडण्यामागे दूसरे कारण म्हणजे हि जागा कोकणातली असून वीरांची भूमी होती. कारण हि जागा जशी छ. शिळवाजी महाराजांची जन्मभूमी होती ,तशीच ती त्यांच्या स्वराज्याची राजधानीही होती. तसेच महाड जवळील पाल्याला बुद्ध लेणी होतील. म्हणजेच हा भाग बुद्धांपासून समतेच्या मार्गावरचा होता. यतसेच या पाल्याला २२ ते २४ एका रांगेत बौद्ध स्तूप आहेत. येथे प्रतिवर्षी कोजागिरी पौर्णिमेला येथिल महार मंडळी या लेण्यांवर जातात व तेथे मुक्काम करून रात्रभर नाच गाणे करून आपला आनंदसोहळा साजरा करतात.अशीही संपूर्ण माहिती चित्रेंनी बाबासाहेबांना पुरवली . यामुळे बाबासाहेब अधिकच आनंदीत झाले. तसेच दूसरे विशेष असे की, रायगडाचा संरक्षक रायनाक महार व म. फुले यांचे शिष्य गोपाळबुवा वलंगकर हे याच भूमीचे भूमीपुत्र होते. हे चवदार तळे ३ एकर २४ गुंठयांचे आहे. तसेच या तळ्यात चौदा विहिरी आहेत. १९५८ च्या दुष्ळाळात पाणी आटल्याने त्यातील दहा विहिरी उघड्या पडल्या होत्या. तसेच या महाड गावाला काकर तळे , कोटेश्वरीचे तळे ,रूमाली तळे , केतकी तळे, चांभार तळे ही पाच तळे आहेत.पण ती आता बुजली आहेत .
महाडला पाण्याचा चवदार तळ्याच्या काठी सत्याग्रह करण्याचें निश्चित झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्याच्या नियोजनासाठी त्यांनी आपल्या मुंबई मध्ये राहणा-या कोकणी कार्यकर्त्यांची एक बैठक आपल्या दामोदर हाॅलमधील कार्यालयात बोलावली. यात संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार संवादकर, रामचंद्र बाबाजी मोरे, आड्रेअर बाबा अशा खुप तरूण मंडळींचा यात सहभाग होता. यातील प्रमुख कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदारी, सत्याग्रहासाठी लागणा-या पैसे जमवण्याची जबाबदारी टाकून, या सत्याग्रहाच्या डरकाळीने संपूर्ण अस्पृश्य समाज जागृत झाला पाहिजे असे निक्षून सांगितले. हा आदेश मिळताच सर्वच कार्यकर्ते कामाला लागले. त्यांनी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांतूधन प्रचारसभांचा धुराळा उडवला. तसेच महाडच्या ग्रामीण भागातही प्रचार दौरे करून संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. यानंतर सत्याग्रहाची १९ व २० मार्च १९२७ हि तारीख निश्चित करण्यात आली. यानंतर बरेच कार्यकर्ते निधीसाठी वस्त्यावस्त्यांतूधन व ऐइगावोगावी फिरून लागले. या निधीसाठी सहकारी नाटक मंडळीने आपल्या ‘ संत तुकाराम ‘ या नाटकाचा एक प्रयोगनिधी साडे तेवीस रूपये दान दिला. महाडच्या खेड्यांतून निधी म्हणून १२० रू.जमवण्यात आले. तसेच आपल्या महाड शहरात सत्याग्रह होणार म्हणून महाडचे नगराध्यक्ष सुरबानांना टिपणीस यांनी भाताची व पैशांची ही मदत केली. तर ‘ कोकणस्थ महार समाज सेवा संघ ‘ या संस्थेचे कार्यकर्ते महिनाभर रजा काढून गावोगावी फिरून पैसे व मिळेल ते धान्य गोळा करत होते. यानंतर सत्याग्रहासाठी जागा महाडमधील वीरेश्वर मंदिरा शेजारील वीरेश्वर थिएटर ५ रुपये भाड्याने १९ व २० या दोन दिवसांसाठी घेतले व सत्याग्रहाची संपूर्ण तयारी चोख केली. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे यांची प्रमुख वक्ते म्हणून निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्ष म्हणून संभाजी तुकाराम गायकवाड यांची व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ आंबेडकर दोन दिवस अगोदरच आले. त्यांच्यासोबत सीताराम नामदेव शिवणकर, बाळाराम रामजी आंबेडकर, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, भाई अऩतराव चित्रे, गणपत महादेव जाधव तथा मडकेबुवा, देवजी दगडूजी डोळस, सीताराम काळू हाटे, दत्तात्रय महादेव चित्रे अशी बरीच मंडळी आली. तर पुण्याहून शांताराम पोतनीस व पांडुरंग नाथुजी राजभोज व इतर मंडळी हजर झाले. यानंतर १९ मार्चच्या सुवर्ण दिन उगवला व सत्याग्रहाचा मंडप माणसांनी खचाखच भरून गेला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना डोळेभरून या पहाण्यासाठी लांबलांबून पायपीट करत आलेली फाटक्या कपड्यातील जनता आसासून गेली. आपला बॅरिस्टर भीमराव दिसतो कसा? बोलतो कसा? तो एवढा शिकला कसा? विलायतेला गेला कसा? या सा-याच प्रश्नांची त्यांना याच स्थळी सोडवणूक करून घ्यायची होती. दूपारी दोन वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन झाले. संपूर्ण सभा मंडप आनंदाने गर्जून उठला. डॉ आंबेडकरांच्या नावाच्या जयघोषाच्या किंकाळ्या अस्मानाचा भिडल्या. सर्वांच्या डोळ्यांची पारणे फिटली. डॉ आंबेडकरांचा स्वगतसंमारंभ व स्वगताध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर रामचंद्र बाबाजी मोरे यांनी व्यासपीठावरील बापुसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंतराव चित्रे , नगराध्यक्ष सुरबानांना टिपणीस, हिंदू महासभेचे बापुराव जोशी, गांधीवादी नेते तुळजाराम मीठा शेठ, व्यापारी शंकरभाई धारिया यांची ओळख करून दिली. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले.
डॉ आंबेडकरांनी समाजला प्रबोधन करताना स्वच्छ रहा, जनावराचे मांस खाण्याचे, भीक मागून अन्न खाण्याचे, मेलेली जनावरे ओढण्याचे काम करण्याचे सोडून देण्यास सांगितले व शेती व्यवसाय करून शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व द्या. शिक्षणच तुमचा उद्धार करेल असे निक्षून सांगितले व स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. यानतंर १९ मार्चची सत्याग्रह परिषद संपली. जेवणं करून यानंतर जनता झोपी गेली. नंतर दूस-या दिवशी परत सत्याग्रह परिषद भरली. सर्वांची भाषणे झाली. यानंतर तीन तीनची रांग करून तीन चार हजार जनता चवदार तळ्यावर आपला समतेचा हक्क बजावण्यास गेली. पाणी पिण्याचा पहिला हक्क चवदार तळ्यात उतरून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बजावला. मग हजारो हातांनी चवदार तळ्याचे पाणी चाखले व शांततेत संपूर्ण जनता परत रांगा करून सत्याग्रह मंडपाकडे परतली.





