जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. १ जुलै २०२६ घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. हिकमतदादा उढाण यांच्या वाढदिवसानिमित्त अंबड तालुक्यातील सुखापूरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सुखापूरी येथील शिवसेना शाखेच्या वतीने राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात आवश्यक असणारे वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी साहित्य वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मिळून त्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणासाठी दिलेला हा पाठिंबा कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास सुखापूरी येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांचे निकटवर्तीय व सुखापूरी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. अशोक भाऊ बोटे यांच्यासह श्री. ढवळे, श्री. लक्ष्मण राखुंडे, श्री. संभाजी शिंदे, श्री. राखुंडे महाराज, श्री. भरत शिंदे, श्री. विकास लहूटे, श्री. संभाजी शिंदे, श्री. डॉ. रेवलगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षकवृंदही कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षण, समाजकार्य आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.








