जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि. २ जुलै २०२६ हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालय, घनसावंगी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांची तसेच हरित क्रांतीतील त्यांच्या कार्याची उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या प्रसंगी डॉ. रमेश तारगे (अशासकीय सदस्य, ग्राहक संरक्षण परिषद, जालना), कृषी कार्यालयाचे वशिष्ठ रेंगे, जाधव तसेच परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन केले.






