जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. १ जुलै २०२६ जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याचे आमदार डॉ. हिकमत दादा उढाण यांचा दि. १ जुलै २०२६ रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवित लखमापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम शिवसेना मागासवर्गीय सेलचे तालुका प्रमुख श्री. सुखदेव कासार यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा हा उपक्रम पालक व ग्रामस्थांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दैनिक सामनाचे पत्रकार रामकिसन अवधूत, श्री. किशोर कांबळे, सुखदेव कासार, विक्रम तांदळे, राम निकम, नारायण निकाळजे, दिलीप कासार, शांतिलाल अवधूत, अंकुश गुडेकर आदींचा समावेश होता. तसेच शाळेचे शिक्षक श्री. अदिनाथ खरमाटे सर व श्रीमती बागल मॅडम यांचीही उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना नव्या उत्साहाने अभ्यासाला सुरुवात करता येईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत आमदार डॉ. हिकमत दादा उढाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.







