अंबाजोगाई / घाटनांदुर, दि. 01 जुलै 2026_घाटनांदुर येथे दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज, मंगळवार दि. 1 जुलै रोजी घाटनांदुर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. व्यापारी प्रतिष्ठाने, वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ग्रामस्थांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.*

नेमकं प्रकरण काय?* काही दिवसांपूर्वी घाटनांदुर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी रामेश्वर नारायण बंडे याच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*घटनास्थळी मारहाण, परस्पर गुन्हे दाखल* गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त झालेल्या काही तरुणांनी घटनास्थळी जाऊन आरोपी मुलाला मारहाण केली. त्यानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी त्या तरुणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हे दाखल केले. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.*दलित समाजाचे निवेदन, तीन प्रमुख मागण्या* या पार्श्वभूमीवर आज घाटनांदुर बंद ठेवून दलित समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दलित समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*निवेदनातील मागण्या :* 1. *तरुणांवरील गुन्हे मागे घ्या :* आरोपी मुलाला मारहाण केल्याप्रकरणी ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते खोटे असून तात्काळ मागे घेण्यात यावेत.2. *सहआरोपींवर कारवाई करा :* ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत या प्रकरणात आरोपीला मदत करणारे, पुरावे नष्ट करणारे जे कोणी असतील त्यांना सहआरोपी करून कारवाई करावी.3. *आरोपीवर कठोर कारवाई :* मुख्य आरोपी रामेश्वर नारायण बंडे याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी.“पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर निष्पाप तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नये. पोलीस प्रशासनाने निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी केली. बंद दरम्यान गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सह पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मुंडे,एस जी सोळुंके,घुगे बाबुराव अशोक भिकड साहेब,बालासाहेब डोंगरे. बंद शांततेत पार पडला.







