बीड प्रतिनिधी
बीड : दि. ३० जून २०२६ बीड जिल्ह्यातील तालखेड येथील विकास दत्तात्रय वाघमोडे यांच्या प्रकरणातील आरोपीला बीडच्या एसीबी पथकाने ठोकल्या बेड्या
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे घडलेल्या खूनप्रकरणाचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली आहे.
तालखेड येथील विकास दत्तात्रय वाघमोडे (वय 33) यांचा मृतदेह 29 जून 2026 रोजी त्यांच्या शेताजवळ आढळून आला होता. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 293/2026 अन्वये कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड करत होती. घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू असताना पोउपनि महेश विघ्ने यांच्या पथकाला माहिती मिळाली की, मयत विकास वाघमोडे व आदित्य बारवाळ यांच्यात काही दिवसांपूर्वी गंभीर वाद झाला होता. तसेच आदित्यने विकासला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली.
या माहितीच्या आधारे आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन चौकशी व तपास करण्यात येत आहे.






