सातारा प्रतिनिधी
सातारा : दि. २९ जून २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील शिरवळ या ठिकाणी धरती सेवा डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष वाटप करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ याठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त धरती डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी वृक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी धरती सेवा डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.निशा विसपुते यांनी नागरिकांना वृक्षतोड झाल्यामुळे आजच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये वृक्षारोपण आणि त्याचे महत्त्व काय आहे याचे मार्गदर्शन करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.तसेच धरती सेवा डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त वृक्ष वाटप व वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प केला असल्याचे मत सौ. रिना ताई पाडवी व अध्यक्षा सौ निशा विसपुते यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रियंका माने वनपाल सामाजिक वनीकरण क्षेत्र खंडाळा, अर्चना जगताप , दक्षता समिती अध्यक्षा श्रीमती अंबिका देशमाने, ग्रामपंचायत सदस्य कोमल ताई व शिरवळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







