शिर्डी प्रतिनिधी
संपादक दिपक गायकवाड
शिर्डी : दि. ३० जून २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या देवठाण गावातील रहिवासी असलेले व आपल्या समाजसेवेच्या कार्याने सर्वांना सुपरिचित असलेले मा. किशोर अडांगळे यांना आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . शिर्डी येथे दि. २९ जून २०२६ रोजी बी.बी.सी. फिल्म आणि ओम साई या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमातून लोककलावंतांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सामाजिक सांस्कृतिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना आमंत्रित करून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध क्षेत्रातील सन्मान चिन्ह देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मेळाव्यास प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी सिनेमा सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री व आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलेल्या जेष्ठ अभिनय सम्राज्ञी ‘अलका कुबल ‘ होत्या अल्पावधितच आपल्या समाजकार्याचा जनमाणसांवर ठसा उमटवलेले व अनेकांच्या उपयोगी पडून जनसेवेचा वसा घेतलेले मा. किशोर अडांगळे यांना सिने अभिनेत्री अलका कुबल यांचे हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा. किशोर अडांगळे यांच्या आजपर्यंतच्या कार्याचे गोड कौतुक जीवनगौरव पुरस्काराने झाले. याचा आनंद व भावना ब-याच जनांच्या तोंडून वदल्या गेल्या. यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्यावर स्तूतीसूमनांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पूढील वाटचालीस व कार्यास अनेक ज्ञात अज्ञात मान्यवरांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्यास सुयश चिंतले व मनापासून आभारही मानले.








