ठाणे प्रतिनिधी
प्रदिप जाधव
कल्याण : दि. २९ जून २०२६ रोजी कल्याण येथून बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा आयोजन करण्यात आले.
कल्याण येथील बुद्धभूमी प्रकरणी भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ जून २०२६ रोजी बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी काढण्यात आला होता. यावेळी या जन आक्रोश महामोर्चात मोठ्या संख्येने भिक्खू, उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला सहभागी झाले. उपस्थितांनी शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या मांडत बुद्धभूमीचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी मार्गदर्शन करताना समाजाने एकजुटीने संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन केले. तसेच बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
महामोर्चामुळे परिसरात सामाजिक ऐक्याचा आणि जनजागृतीचा संदेश पोहोचला असून, संबंधित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





